Shreyas Iyer - Shardul Thakur | Ranji Trophy 2023-24 Final | Mumbai Cricket Sakal
Cricket

Mumbai Cricket: 'तुमच्यासारखा कुलकर्णी येणार नाही...', श्रेयस, शार्दुलसह मुंबईच्या खेळाडूंकडून धवलला मराठीतून शुभेच्छा

Ranji Trophy 2023-24: मुंबईकडून शेवटचा सामना खेळलेल्या धवल कुलकर्णीला श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूरसह अनेक संघसहकाऱ्यांना खास मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Dhawal Kulkarni News: गुरुवारी (14 मार्च) मुंबई संघाने रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भाला 169 धावांनी पराभूत करत 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरले.

दरम्यान, हा सामना मुंबईचा गोलंदाज धवल कुलकर्णीचा अखेरचा सामना होता. त्याने या सामन्यानंतर निवृत्ती घेतली आहे. 36 वर्षीय धवल 16 वर्षे मुंबईकडून खेळला.

त्याच्या निवृत्तीबद्दल मुंबई संघातील खेळाडूंनी त्याला मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. याचा व्हिडिओही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर आणि शम्स मुलानी धवलला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये दिसते की श्रेयस म्हणाला, 'आम्ही तुम्हाला मिस करू. तुम्ही संघाचा महत्त्वाचा भाग होता. तुम्हाला सेकंड इनिंगसाठी शुभेच्छा. तुम्ही यापुढे जे कराल, ते मनापासून कराल.'

त्यानंतर शार्दुल म्हणाला, 'धवल आम्ही तुम्हाला खुप मिस करू. तुझ्याबरोबर 12 वर्षे एकत्र खेळून मजा आली. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.' तसेच शॉने देखील शुभेच्छा देताना म्हटले, 'तुम्ही मुंबईसाठी आणि भारतासाठी जे काही केले, त्याबद्दल आभार. तुमच्या सेकंड इनिंगसाठी शुभेच्छा.'

व्हिडिओच्या शेवटी शम्स मुलानी म्हणाला, 'मुंबई क्रिकेटमध्ये खुप कुलकर्णी येतील. पण तुमच्यासारखा कुलकर्णी नाही येणार. तुम्हाला खुप शुभेच्छा.'

दरम्यान रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धवल कुलकर्णीने पहिल्या डावात 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावात विदर्भाची शेवटी विकेट घेत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते.

धवलने त्याच्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 95 सामने खेळले. यामध्ये त्याने 281 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्याने 130 लिस्ट ए सामने खेळले असून 223 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्याने 162 टी20 सामने खेळताना 154 विकेट्स घेतल्या.

त्याने भारतीय संघाचे 12 वनडे आणि 2 टी20 सामन्यांतही प्रतिनिधित्व केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Solapur News: सोलापूर काँग्रेसच्या मातृसत्ता हरपली! माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन

Uddhav Nimse : राहुल धोत्रे खून प्रकरण: २५ दिवसांनंतर उद्धव निमसे अखेर पोलिसांच्या ताब्यात

Sangli Fake IT Raid Case: 'स्पेशल 26' चित्रपटाप्रमाणे डॉक्टरच्या घरावर आयकर छापा, सोने व रोकड लंपास | Sakal News

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

SCROLL FOR NEXT