Ravichandran Ashwin esakal
Cricket

Ravichandran Ashwin : @500! अश्विनने कुंबळे अन् अँडरसनला मागं टाकत रचला इतिहास

Ravichandran Ashwin IND Vs ENG : अश्विनने झॅक क्राऊलीची शिकार करत इतिहास रचला

अनिरुद्ध संकपाळ

Ravichandran Ashwin IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चहापानानंतर इंग्लंडने आपला पहिला डाव धडाक्यात सुरू केली. पहिल्या 10 षटकात 67 धावा करणारी इंग्लंडची बेन डकेट आणि झॅक क्राऊलीची जोडी अखेर अश्विनने फोडली.

त्याने झॅक क्राऊलीला 8 धावांवर बाद केलं. याचबरोबर अश्विनने कसोटी क्रिकेटमधील आपल्या 500 विकेट्स देखील पूर्ण केल्या. अश्विनने सर्वात कमी कसोटी खेळून 500 विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत अनिल कुंबळेला मागे टाकले. आता अश्विन या यादीत मुथय्या मुरलीधरननंतरचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यात 500 विकेट्स घेणारे गोलंदाज

  • मुथय्या मुरलीधरन - 87 कसोटी सामन्यात 500 विकेट्स

  • रविचंद्रन अश्विन - 98 कसोटी सामन्यात 500 विकेट्स

  • अनिल कुंबळे - 105 कसोटी सामन्यात 500 विकेट्स

  • शेन वॉर्न - 108 कसोटी सामन्यात 500 विकेट्स

  • ग्लेन मॅग्रा - 110 कसोटी सामन्यात 500 विकेट्स

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 500 विकेट्स घेणारे गोलंदाज

  • ग्लेन मॅग्रा - 25528 चेंडूत 500 विकेट्स

  • रविचंद्रन अश्विन - 25714 चेंडूत 500 विकेट्स

  • जेम्स अँडरसन - 28150 चेंडूत 500 विकेट्स

  • स्टुअर्ट ब्रॉड - 28430 चेंडूत 500 विकेट्स

  • कर्टली वॉल्श - 28833 चेंडूत 500 विकेट्स

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताने आपल्या पहिल्या डावात 445 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने आपला पहिला डाव आक्रमकपणे सुरू केला. बेन डकेटने आक्रमकपणे फलंदाजी केली. त्याने झॅक क्राऊली सोबत 10 षटकात 67 धावांची सलामी दिली. त्यात डकेटच्या 40 चेंडूत 50 धावांचे योगदान होते.

क्राऊली बाद झाल्यानंतर बेन डकेटने आपला आक्रमक बाणा कायम राखत 80 चेंडूत 97 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडनेही 24 षटकात 138 धावा केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT