Ravindra Jadeja | Team India Sakal
Cricket

IND vs BAN, Video: रवींद्र जडेजा आशियाई 'सर'! असा पराक्रम जो कोणालाच नाही जमला, तो जड्डूने केला

Ravindra Jadeja 300 Test Wickets: कानपूर कसोटीत बांगलादेशची पहिल्या डावातील शेवटची विकेट रवींद्र जडेजाने घेत मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

India vs Bangladesh 2nd Test: भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सामना सुरू आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने मोठे विक्रम केले आहेत. पावसाचा अडथळा आलेल्या या सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव चौथ्या दिवशी ७४.२ षटकात २३३ धावांवर संपला.

दरम्यान, बांगलादेशची शेवटची विकेट जडेजाने घेतली. त्याने ७५ व्या षटकात आपल्याच गोलंदाजीवर खलीद अहमदचा झेल घेत बांगलादेशचा डाव संपवला. जडेजासाठी ही विकेट विक्रमी ठरली. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील ३०० वी विकेट ठरली.

कसोटीमध्ये ३०० विकेट्स घेणारा तो भारताचा सातवा गोलंदाज ठरला आहे. तसेच त्याने ३०० वी विकेट घेण्यासाठी १७४२८ चेंडू टाकले आहेत. त्यामळे तो सर्वात कमी चेंडू टाकून ३०० विकेट्स घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज आहे.

पहिल्या क्रमांकावर आर अश्विन आहे. अश्विनने १५६३६ चेंडूत ३०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या. तसेच जडेजा ३०० कसोटी विकेट्स घेणारा रंगना हेराथ आणि डॅनिएल विट्टोरी यांच्यानंतरचा तिसराच डावखुरा फिरकीपटू ठरला आहे.

इतकेच नाही, तर जडेजाने यापूर्वीच कसोटीत ७४ सामन्यांमध्ये ३१०० हून अधिक धावा केलेल्या आहेत. त्यामुळे तो कसोटीमध्ये ३०० विकेट्स आणि ३००० धावा करणारा जगातील चौथाच फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू आहे.

यापूर्वी असा विक्रम डॅनिएल विट्टोरी (४५३१ धावा आणि ३८२ विकेट्स), आर अश्विन (३४२२ धावा आणि ५२२ विकेट्स*) आणि शेन वॉर्न (३१५४ धावा आणि ७०८ विकेट्स) यांनी केला आहे.

एवढंच नाही, तर जडेजाने अश्विन, विट्टोरी आणि वॉर्न यांच्यापेक्षा कमी सामन्यांमध्ये हा कारनामा केला आहे. त्याने केवळ ७४ व्या सामन्यातच ३०० विकेट्स आणि ३००० धावा पूर्ण केल्या आहेत.

यापूर्वी हा टप्पा गाठण्यासाठी अश्विनला ८८ सामने लागले होते. तसेच विट्टोरीने ९४ सामन्यांत, तर शेन वॉर्नने १४२ सामन्यांमध्ये हा कारनामा केला. यामुळे जडेजा कसोटीत ३००० धावा आणि ३०० विकेट्स असा टप्पा सर्वात जलद पूर्ण करणारा आशियाई खेळाडू ठरला आहे.

जडेजाने त्याच्या कारकि‍र्दीत ४ शतके आणि २१ अर्धशतकेही केली आहेत. त्यामुळे तो २५ किंवा त्यापेक्षा अधिक वेळा ५० धावांचा पार करणारा आणि ३०० विकेट्सही घेणारा केवळ चौथा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम कपिल देव, इयान बॉथम आणि डॅनिएल विट्टोरी यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HBA Scheme: तुम्ही होम लोनचा हप्ता भरू शकत नाहीत? सरकारकडून मिळतेय 25 लाख रुपयांची मदत

Disqualification Bill: पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना 30 दिवस तुरुंगवास झाल्यास पदमुक्त होणार! संसदेत मांडलं जाणार ऐतिहासिक विधेयक

Mobile Protection Tips: पावसाळ्यात मोबाईल भिजतोय? काळजी करू नका, हे उपाय करा!

Prithvi Shaw : मला कुणाची सहानुभूति नकोय... महाराष्ट्र संघाकडून शतक झळकावताच पृथ्वी शॉचा आजी-माजी खेळाडूंना टोमणा

Chiploon Karad Accident : चिपळूण-कऱ्हाड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात पुण्याचे ५ जण ठार, रिक्षाचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT