RCB Win WPL 2024 virat kohli congratulate smriti mandhana on video call 
Cricket

RCB Win WPL 2024 : ट्रॉफी ताफ्यात आली रे...! बंगळुरू चॅम्पियन झाल्यानंतर विराट कोहलीने स्मृतीला केला व्हिडिओ कॉल

Virat Kohli Congratulate Smriti Mandhana on Video Call : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फ्रेंचायझी आणि चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आरसीबीने आज विजेतेपद न जिंकण्याचा 16 वर्षांचा दुष्काळ संपवला.

Kiran Mahanavar

Virat Kohli Congratulate Smriti Mandhana on Video Call : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फ्रेंचायझी आणि चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आरसीबीने आज 16 वर्षाचा विजेतेपदाचा दुष्काळ संपला आहे. आयपीएलच्या 16 हंगामात विराट कोहली आरसीबीसाठी जे करू शकला नाही ते स्मृती मंधानाने दुसऱ्याच हंगामात करून दाखवले. स्मृती मानधनाने आरसीबीला महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवून दिले. अंतिम सामन्यात बंगळुरूने दिल्लीचा 8 गडी राखून पराभव केला.

महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात प्रथम खेळताना दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 114 धावांचे लक्ष्य दिले होते, जे स्मृती मानधनाच्या संघाने 3 चेंडू बाकी असताना केवळ दोन गडी गमावून सहज गाठले. बंगळुरू चॅम्पियन झाल्यानंतर विराट कोहलीने स्मृती मानधनाला व्हिडिओ कॉल करून जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. आरसीबीसाठी मंधानाने 31 धावा, सोफी डिव्हाईनने 32 धावा आणि एलिस पेरीने नाबाद 35 धावा केल्या.

आरसीबीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत सात कर्णधारांना आजमावले आहे, पण एकही कर्णधार त्यांना ट्रॉफी जिंकू देऊ शकला नाही. या कर्णधारांमध्ये विराट कोहली, राहुल द्रविड, केविन पीटरसन आणि फाफ डू प्लेसिस यांचा समावेश आहे. WPL च्या लीग टप्प्यात RCB ने 4 सामने जिंकले आणि 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरले. एलिमिनेटरमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT