Rinku Singh - Suryakumar Yadav Sakal
Cricket

IND vs SL, Video: 'भाई, माझ्या नावावर पण विकेट्स आहेत!' रिंकू सिंगने सामन्यानंतर सांगितला सूर्याचा मास्टर प्लान

Suryakumar Yadav Bowling: भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. या सामन्यात शेवटच्या षटकांमध्ये वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांनी केलेली गोलंदाजी महत्त्वाची ठरली.

Pranali Kodre

Rinku Singh on Suryakumar Yadav Video: मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेत ३-० अशा फरकाने विजय मिळवला. भारताने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा आणि अखेरचा टी२० सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला.

या सामन्यात शेवटच्या षटकांमध्ये वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांनी केलेली गोलंदाजी महत्त्वाची ठरली. या सामन्यात विजयासाठी श्रीलंकेला शेवटच्या चार षटकात २३ धावांची गरज होती.

त्यावेळी १७ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने वनिंदू हसरंगा आणि श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका यांना बाद केले. त्यानंतर १९ व्या षटकात कर्णधार सूर्यकुमार यादवने रिंकू सिंगच्या हातात गोलंदाजीसाठी चेंडू सोपवला.

रिंकूनेही हा विश्वास सार्थ ठरवत कुशल परेराला ४६ धावांवर बाद केले. याच षटकात त्याने रमेश मेंडिसलाही बाद केले. तरी श्रीलंकेला शेवटच्या षटकात श्रीलंकेला ६ धावांची गरज होती.

पण या षटकात सूर्यकुमारने गोलंदाजीला येत कामिंडू मेंडिस आणि महिश तिक्षणा यांना बाद करत केवळ ५ धावा दिल्या. त्यामुळे सामन्यात बरोबरी झाली होती आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

दरम्यान, या सामन्यानंतर बुधवारी बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि रिंकू सिंग शेवटच्या षटकांबद्दल बोलताना दिसत आहेत.

या व्हिडिओच्या सुरुवातीला सूर्यकुमारने रिंकूला विचारलं 'तू हुकमी एक्का १९ व्या की २० व्या षटकाला म्हणत आहेस?' त्यावर रिंकू म्हणतो, 'माझ्या नावावर खूप विकेट्स आहेत. इंटरनॅशन वनडेमध्येही माझ्या नाववर विकेट आहे.' हे ऐकून तिथे असलेल्या संजू सॅमसनलाही हसू आवरत नाही.

सूर्यकुमार सामन्याबद्दल म्हणाला, 'मी दुसर्‍या कर्णधारांच्या नेतृत्वात असे अटीतटीचे सामने यापूर्वीही खेळलो आहे. कसं शेवटच्या चेंडूपर्यंत नेऊन सामने जिंकता येतात. मी सर्वांना सांगून ठेवलं होतं की थोडी नेट्समध्येही गोलंदाजी करा. कारण येथे अशा खेळपट्ट्या असतात की जर थोडीही कोरडी खेळपट्टी मिळाली, तर गोलंदाजी करावी लागू शकते.'

सूर्यकुमार शेवटच्या षटकांमध्ये घेतलेल्या निर्णयाबद्दल पुढे म्हणाला, 'जेव्हा धावा आणि चेंडूची संख्या समान होती, तेव्हा एक महिन्यापूर्वीची (टी२० वर्ल्ड कप फायनल) आठवण झाली. पण या खेळपट्टीवर चेंडू फिरत होता. त्यामुळे मी विचार केला की इथे एखादी विकेट मिळाली, तर त्यांच्यावर दबाव वाढेल. आऊट ऑफ द बॉक्स विचार माझ्या डोक्यात आला आणि मी तो निर्णय घेतला. मला आवडत की जेवढी मोठी जोखीम, तेवढं मोठं बक्षीस.'

'मी मुंबईत इतकं क्रिकेट खेळलोय, देशांतर्गत क्रिकेट खेळलोय, त्यामुळे मी शिकलोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यानंतर मी माहीभाई, रोहितभाई, विराट यांच्याकडे पाहून शिकलो, कसं काय करायच.'

दरम्यान, आता श्रीलंकेविरुद्ध २ ऑगस्टपासून वनडे मालिका होणार असून यामध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या संघात सूर्यकुमारचा समावेश नाही. त्यामुळे त्याने रोहितला असा मेसेजही दिला की तुझे वनलाईनर ऐकण्यास मी उत्सुक आहे.

याशिवाय रिंकू सिंगने त्याच्या गोलंदाजीबद्दल सांगितले की सूर्यकुमारने त्याला गोलंदाजीसाठी तयार राहा असं आधीच सांगितलं होतं. पण या सामन्यात वाटलं नव्हतं की गोलंदाजी मिळेल. मात्र, सूर्याने चेंडू हातात दिला आणि दोन विकेट्स घेतल्या.

याशिवाय भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतूले म्हणाले, 'सूर्या खूपवेळा सरप्रायईज करतो, खरंच त्याने घेतलेला निर्णय कठीण होता. या मालिकेतून हेच शिकायला मिळतं की फलंदाजांनी गोलंदाजी करायला पाहिजे. अशा खेळपट्ट्यांवर असे एखादे षटक महत्त्वाचे ठरू शकते.'

तसेच वॉशिंग्टन सुंदर म्हणाला, 'रिंकू सिंगला गोलंदाजी देणे, हा खरंतर त्यावेळी कठीण निर्णय सूर्यकुमारने घेतला. रिंकू जेव्हा नेट्समध्ये आम्हाला गोलंदाजी करतो, तेव्हा त्याला खेळणे आम्हालापण कठीण जाते. आता त्याने सामन्यातही दाखवून दिले.'

'सूर्यानेही कठीण परिस्थितीत गोलंदाजी केली. मला माझ्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे होते आणि मला देशासाठी सामना जिंकून देण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे.'

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १३७ धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकनेही २० षटकात ८ बाद १३७ धावाच केल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला २ बाद २ धावाच करता आल्या. त्यानंतर भारताकडून सूर्यकुमारने सुपर ओव्हरमध्ये चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT