Rocky Flintoff first century sakal
Cricket

Rocky Flintoff : बाप तसा बेटा! अँड्य्रू फ्लिंटॉफच्या १६ वर्षाच्या लेकाने कसोटीत झळकावले खणखणीत शतक

Rocky Flintoff first century - इंग्लंडचा महान अष्टपैलू खेळाडू अँड्य्रू फ्लिंटॉप याचा मुलगा क्रिकेटचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

Swadesh Ghanekar

Rocky Flintoff first century - इंग्लंडचा महान अष्टपैलू खेळाडू अँड्य्रू फ्लिंटॉफ याच्या पावलावर पाऊल टाकत १६ वर्षांच्या रॉकी फ्लिंटॉपने मैदान गाजवायला सुरूवात केली आहे. श्रीलंकेचा १९ वर्षांचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि त्या मालिकेतील Unofficial कसोटीत इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना रॉकीने दमदार शतक झळकावले आहे. इंग्लंड संघाकडून हे त्याचे पहिलेच शतक ठरले. त्याच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने ४७७ धावांचा डोंगर उभा केला.

श्रीलंकेचा पहिला डाव १५३ धावांत इंग्लंडने गुंडाळला. गयाना विरासिंघे ( ७७) सोडल्यास श्रीलंकेच्या अन्य फलंदाजांनी माना टाकल्या. नाव्या शर्माने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. हॅरी मूर व चार्ली बर्नार्ड यांनी प्रत्येकी २ बळी टिपले. प्रत्युत्तरात, इंग्लंडने ४७७ धावा चोपल्या. जयडन डेन्ली ( ९१) व केशाना फॉन्सेका ( ७६) यांच्या दमदार खेळीनंतर कर्णधार हम्झा शेख व रॉकी यांनी खिंड लढवली.

हम्झाने २११ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह १०७ धावा केल्या, तर रॉ़कीने १८१ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह १०६ धावांची खेळी केली.

रॉकीने ॲल्डरले एज, चेशायर येथील स्थानिक क्लबमध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि २०२० मध्ये सेंट ॲनेस सीसीकडून खेळला. २०२३ मध्ये बनबरी फेस्टिव्हलमध्ये तो नॉर्थकडून खेळला आणि त्या समर सीझनमध्ये साउथपोर्ट आणि बर्कडेलसाठी त्याने पदार्पण केले. लिव्हरपूलकडून जिल्हा क्रिकेट स्पर्धेत पदार्पणात त्याने ९८ चेंडूत ७६ धावा केल्या. २०२४ मध्ये लँक्स सेकंड-इलेव्हनसाठी पहिले शतक झळकावले. त्याने वॉरविकशायर इलेव्हनविरुद्ध १६५ चेंडूत ११६ धावा केल्या. वयाच्या १६ वर्षे आणि १६ दिवसांच्या वयात, तो चॅम्पियनशिपमध्ये शतक झळकावणारा तिसरा सर्वात तरुण खेळाडू आणि लँकेशायरचा सर्वात तरुण खेळाडू ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT