Rohit Sharma back as India captain for Sri Lanka ODIs on Gautam Gambhir request sakal
Cricket

India squad vs SL : कर्णधार निवडीबाबत नवा ट्विस्ट! गौतम गंभीरची विनंती मान्य; श्रीलंका दौऱ्यावर हिटमॅन करणार टीमचे नेतृत्व

India Squad for Sri Lanka Tour 2024 Update : 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर नुकताच टी-20 मधून निवृत्त झालेल्या रोहित शर्माला सुरुवातीला या मालिकेदरम्यान विश्रांती देण्याची अपेक्षा होती. आता तोच कर्णधार असेल असे सांगितले जात आहे....

Kiran Mahanavar

India squad for Sri Lanka tour : गौतम गंभीर पहिल्यांदाच मुख्य प्रशिक्षक म्हणून श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघासोबत जाणार आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कप 2024 पर्यंत होता. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने नुकतेच टी-20 वर्ल्ड कप जिंकले. श्रीलंका दौऱ्यासाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात येणार होती. पण आता एका रिपोर्टनुसार, रोहितला गौतम गंभीरने उपलब्ध राहण्यास सांगितले आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला फक्त 3 वनडे खेळायचे आहेत.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, रोहित शर्माविरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमन करू शकतो. असे सांगण्यात आले की, प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी वरिष्ठ खेळाडू रोहित शर्माला एकदिवसीय मालिकेसाठी स्वत:ला उपलब्ध करून देण्यास सांगितले होते.

श्रीलंका दौऱ्यानंतर त्याला दीर्घ विश्रांती मिळू शकते. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला फक्त 6 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत, असे यामागचे कारण देण्यात आले होते. या वर्षी श्रीलंकेविरुद्ध तर पुढच्या वर्षी इंग्लंडविरुद्ध जानेवारीच्या आसपास वनडे सामने खेळायचे आहेत.

त्यामुळे आता रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करतो की नाही हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. जर रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध कर्णधार नसेल तर केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. कारण विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली जाणार आहे.

केएल राहुलने अनेक वेळा एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. आतापर्यंत त्याने 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. या कालावधीत त्याने 8 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर त्यांना 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आता जर केएल राहुलला श्रीलंकेविरुद्ध कर्णधारपद दिले तर कामगिरी कशी असेल हे पाहायचे आहे. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर 3 वनडे खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 2 ऑगस्टला, दुसरा 4 ऑगस्टला आणि तिसरा एकदिवसीय सामना 7 ऑगस्टला खेळला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT