Rohit Sharma Ind vs Eng Marathi News 
Cricket

Rohit Sharma Ind vs Eng : कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कर्णधार रोहित का गेला बाहेर? BCCI ने दिली मोठा अपडेट

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धरमशालाच्या मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या 2 दिवसांच्या खेळात टीम इंडियाने या सामन्यावर आपली पकड मजबूत केली.

Kiran Mahanavar

Rohit Sharma Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धरमशालाच्या मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या 2 दिवसांच्या खेळात टीम इंडियाने या सामन्यावर आपली पकड मजबूत केली.

तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाचा पहिला डाव 477 धावांवर संपला. आणि भारतीय संघाने 259 धावांची आघाडीही घेतली. यानंतर टीम इंडिया क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आली तेव्हा कर्णधार रोहित शर्मा सोबत आला नाही, त्यानंतर बीसीसीआयने त्याच्या फिटनेसबाबत अपडेट देण्यात आले. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाच्या पहिल्या डावात 103 धावांची शानदार खेळी पाहायला मिळाली.

बीसीसीआयने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबत एक मोठे अपडेट शेअर केले आहे. भारताचा पहिला डाव संपल्यानंतर टीम इंडिया क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आली तेव्हा कर्णधार रोहित शर्मा त्याच्यासोबत नव्हता. त्याच्याबद्दल माहिती देताना बीसीसीआयने सांगितले की, तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी तो मैदानात आला नाही.

या मालिकेत कर्णधार रोहित शर्माच्या दोन शानदार शतकी खेळी पाहायला मिळाल्या. या सामन्यातही त्याची बॅट जोरात बोलली. रोहितच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सांभाळत आहे, ज्याने या मालिकेत आतापर्यंत चेंडूसह चांगली कामगिरी केली आहे.

धरमशाला कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पहिला डाव खेळण्याच्या पहिल्या दिवशी 218 धावांवर गुंडाळला. यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने शानदार शतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर रोहितने 103 धावांची खेळी केली, तर शुभमन गिलनेही 110 धावांची खेळी केली. मधल्या फळीत देवदत्त पडिकलने 65 धावा केल्या तर सर्फराज खान 56 धावा करण्यात यशस्वी ठरला. इंग्लंडकडून शोएब बशीरने या डावात 5 तर जेम्स अँडरसन आणि टॉम हार्टलीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

Indias Most Richest and Poorest CM: भारतातील सर्वात श्रीमंत अन् सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? ‘ADR’ रिपोर्टमधून झाले उघड!

SCROLL FOR NEXT