Rohit Sharma esakal
Cricket

Rohit Sharma IND vs ENG : एक व्यक्ती ज्याचं नाव ऋषभ पंत... रोहितने एका वाक्यात बेन डकेटचा विषय संपवला

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma India Vs England 5th Test : पाचव्या कसोटीपूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा कोणताही बाऊन्सर जाऊ देण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्याने पत्रकार परिषदेत प्रत्येक प्रश्नावर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी त्याला इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटने यशस्वी जैस्वालच्या आक्रमक खेळीचे श्रेय इंग्लंड संघाला देखील जातं यावर त्याचं मत विचारलं त्यावेळी त्याने डकेटला चिमटा काढत षटकार ठोकला.

रोहित शर्मा म्हणाला की, 'आमच्या संघात एक व्यक्ती होता ज्याचं नाव ऋषभ पंत आहे. मला वाटता बेन डकेटने त्याला खेळताना पाहिलं नसेल.'

यशस्वी जैस्वाल हा भारताचा मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 4 सामन्यात 94.57 च्या सरासरीने आणि 78.63 च्या स्ट्राइक रेटने 655 धावा केल्या आहेत. राजकोट कसोटीदरम्यान भारताच्या युवा फलंदाजांने इंग्लंडची केलेली धुलाई पाहून डकेटने यशस्वीचं कौतुक केलं मात्र याचं श्रेय इंग्लंडच्या बॅझबॉल क्रिकेटलाही जातं असे म्हणते श्रेय लाटण्याचा प्रयत्न देखील केला.

बेन डकेट म्हणाला होता की,"जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना असे खेळताना पाहता तेव्हा असे वाटते की याचं थोडं श्रेय आपण देखील घेतलं पाहिजे. इतर संघापेक्षा ते वेगळं क्रिकेट खेळत आहेत."

केवळ रोहितलाच डकेटची टिप्पणी निंदनीय वाटली असे नाही. याआधी, इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसैन यानेही डकेटवर टीकास्त्र सोडले होते. "तो तुमच्याकडून शिकलेला नाही. तो त्याच्या जडणघडणीतून शिकला आहे, त्याला मोठे होण्यासाठी किती कष्ट करावे लागले आहेत. मुलांनो त्याच्याकडे पहा आणि त्याच्याकडून शिका. मला आशा आहे की थोडे आत्मपरिक्षण सुरू झाले असावे. अन्यथा, बॅझबॉल एक पंथ बनतो आणि काही वेळा आपण संघाच्या आतून किंवा बाहेरून टीका होत नाही,"

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT