Suryakumar Yadav vs Hardik Pandya Rohit Sharma  sakal
Cricket

Team India T20 Captain : पडद्यामागे नेमकं काय घडतंय? रोहित शर्मामुळे हार्दिक पांड्याचा पत्ता कट? सूर्यादादा होणार टीम इंडिया कर्णधार

India squad for Sri Lanka tour : टीम इंडियाचा पुढचा T20 कर्णधार कोण असेल? याचे उत्तर शोधण्याचा बीसीसीआय सातत्याने प्रयत्न करत आहे यादरम्यान....

Kiran Mahanavar

Team India New T20 Captain : टी-20 वर्ल्ड कप 2024 संपल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. हिटमॅनच्या निवृत्तीनंतर बीसीसीआय टी-20 फॉरमॅटसाठी कायमस्वरूपी कर्णधाराच्या शोधात आहे.

रोहितनंतर हार्दिक पांड्याला टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा नियमित कर्णधार बनवले जाऊ शकते, अशा बातम्या अलीकडे आल्या होत्या. पण, आता नव्या वृत्तानुसार, रोहित शर्मामुळे आता हार्दिक नव्हे तर सूर्यकुमार यादव टी-20चा कायमस्वरूपी कर्णधार म्हणून पाहिले जात आहे.

रोहित शर्माने टी-20 मधून निवृत्ती घेतल्यापासून टीम इंडियाच्या पुढील टी-20 कर्णधाराचा शोध सुरू आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर जवळपास सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती, तेव्हा शुभमन गिलकडे संघाची कमान सोपवण्यात आली होती. परंतु तो फक्त त्या मालिकेसाठी कर्णधार बनला होता.

आता बोर्ड अशा कर्णधाराच्या शोधात आहे, जो दीर्घकाळ टी-20 फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करू शकेल. कर्णधाराच्या नावाबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रोहित शर्माकडून मत मागवले.

आता रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, जेव्हा रोहितला टी-20 कर्णधाराबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवले पाहिजे. अशा स्थितीत हिटमॅनच्या या मतानंतर हार्दिकसाठी कर्णधार बनणे कठीण दिसत आहे.

कोणाचा रेकॉर्ड भारी?

भारतीय स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादवचा कर्णधारपदाचा विक्रम हार्दिक पांड्यापेक्षा चांगला दिसत आहे. हार्दिकने आतापर्यंत 16 टी-20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे, ज्यामध्ये त्याने 10 सामने जिंकले आहेत, 5 गमावले आहेत, तर 1 सामना बरोबरीत राहिला आहे.

दुसरीकडे, सूर्याने सात टी-20I सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे, ज्यामध्ये त्याने 5 जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. जरी सुर्याने कमी सामन्यांमध्ये कर्णधार केले असले तरी त्याचे रेकॉर्ड अधिक चांगले दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT