Rohit Sharma | Hardik Pandya | Mumbai Indians X/MumbaiIndians
Cricket

Mumbai Indians Video: 'रोहितचं आगमन, प्रेस कॉन्फरेन्स आणि बरंच काही...', कर्णधार पांड्या तरी फुटेज खाल्लं हिटमॅननं

Rohit Sharma: मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचे संघात आगमन झाल्यानंतरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rohit Sharma Joins Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला येत्या शुक्रवारपासून (17 मार्च) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण मुंबई इंडियन्स यंदा पहिल्यांदाच हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. असे असले तरी मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माची चर्चा जोरदार होत आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सला पहिला सामना 24 मार्च रोजी अहमदाबादला गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचा आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्सने जोरदार तयारी सुरू केली आहे.

मुंबईच्या ताफ्यात नवा कर्णधार हार्दिकचे गेल्याच आठवड्यात आगमन झाले आहे. मात्र आयपीएलला सुरु व्हायला आठवड्यापेक्षाही कमी वेळ राहिला असूनही रोहित संघाशी जोडला गेला नसल्याने चर्चांना उधाण आले होते. परंतु, अखेर सोमवारी (18 मार्च) रोहित मुंबई संघात दाखल झाला. इतकेच नाही, तर त्याने सरावालाही सुरुवात केली आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सने मंगळवारी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहितचे मुंबई इंडियन्स संघात झालेले आगमन दाखवण्यात आले आहे. तसेच हार्दिक पत्रकार परिषदेसाठीही उपस्थित असल्याचे दिसत आहे.

त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी रोहित सराव करत असल्याचे दिसत आहे. एकूण व्हिडिओमध्ये रोहितला अधिकवेळ दाखवण्यात आले आहे. इतकेच नाही, तर या व्हिडिओच्या खाली आलेल्या कमेंट्समध्येही रोहितचीच चर्चा होत आहे.

पत्रकार परिषदेतही हार्दिकला रोहितबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातच हार्दिकने उत्तर दिले की अद्याप रोहितशी त्याने चर्चा केलेली नाही. पण तो संघात आल्यानंतर तो त्याच्याशी बोलेल. तसेच हार्दिकने असाही विश्वास व्यक्त केला की त्याला माजी कर्णधार रोहितची साथ मिळेल.

पहिल्या सामन्यालाच वादाची किनार?

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की हार्दिकचे २ हंगामांनंतर मुंबई संघात पुनरागमन झाले आहे. हार्दिक मुंबईकडून 2015 ते 2021 दरम्यान आयपीएल खेळला होता. पण 2022 आयपीएलपूर्वी त्याला मुंबईने करारमुक्त केले.

त्यावेळी गुजरात टायटन्सने त्याला संघात सामील करून घेतले आणि त्याच्याकडे कर्णधारपदही सोपवले. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने 2022 आणि 2023 सालच्या हंगामात अंतिम सामन्यात धडकही मारली.

विशेष म्हणजे 2022 मध्ये गुजरातने विजेतेपदही पटकावले, तर 2023 मध्ये गुजरातला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यानंतर आता अचानक आयपीएल 2024 च्या लिलावानंतर गुजरातने हार्दिकला मुंबईला तब्बल 15 कोटींमध्ये ट्रेड केले. त्यामुळे हार्दिकची मुंबईत घरवापसी झाली. पण तोपर्यंत सर्व गोष्टी ठिक होत्या.

मात्र मुंबईने अचानक रोहितला कर्णधारपदावरून हटवत हार्दिककडे नेतृत्वाची जबाबदारी दिली. त्यामुळे वादाला तोंड फुटले. रोहितने गेल्या 10 वर्षात मुंबईचे नेतृत्व करताना पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते.

तसेच त्याच्याकडे भारतीय संघाचेही कर्णधारपद आहे. अशा परिस्थितीत त्याच्याऐवजी हार्दिकला कर्णधार केल्याने चर्चेला उधाण आले. हा निर्णय घेण्यामागील कारण अद्याप कोणाकडूनच अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आले नाही.

या सर्व घटनांमुळे रोहित शर्माच्या आणि गुजरात टायटन्सच्या चाहत्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून आली. त्याचमुळे आयपीएल 2024 मध्ये मुंबई आणि गुजरात यांच्यात होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT