Rohit Sharma | Virat Kohli Sakal
Cricket

IND vs SL : रोहित-विराटसह 'हे' दिग्गज श्रीलंका मालिकेतून बाहेर? अहवालात धक्कादायक खुलासा

India Tour of Sri Lanka 2024 : टीम इंडिया सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे, जिथे पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. यानंतर या महिन्याच्या शेवटी टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.

Kiran Mahanavar

टीम इंडिया सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे, जिथे पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. यानंतर या महिन्याच्या शेवटी टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. 27 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने, हे दोन्ही महान खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमन करू शकतील, अशी अपेक्षा होती. परंतु आता द इंडियन एक्सप्रेसच्या हवाल्याने एक वृत्त समोर आले आहे की, विराट कोहलीशिवाय रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांनाही श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते.

या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, सप्टेंबरमध्ये पूर्ण हंगाम सुरू होण्यापूर्वी बीसीसीआय रोहित शर्मा, कोहली आणि बुमराह यांना विश्रांती देऊ शकते. यानंतर हे तीन खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून मैदानात परतू शकतात.

भारतीय संघ सप्टेंबरमध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. जिथे त्याला 2 कसोटी आणि 3 टी-20 सामने खेळायचे आहेत. बांगलादेशनंतर भारत न्यूझीलंड संघाचे यजमानपद भूषवणार आहे. ज्यामध्ये तीन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

त्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. जिथे त्यांना 4 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. भारत 22 नोव्हेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असेल, जिथे उभय संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.

श्रीलंका मालिकेत भारताला मिळणार नवा कोच

टीम इंडिया सध्या सतत व्यस्त राहणार आहे. मात्र, भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा अद्याप झालेली नाही. राहुल द्रविडचा कार्यकाळ 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर संपला आहे. सध्या एनसीएचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यात भारताचे अंतरिम प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. पण बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नुकतेच सांगितले होते की टीम इंडिया नवीन प्रशिक्षकासह श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT