Rohit Sharma | India vs Bagladesh 2nd Test Sakal
Cricket

Out-Not Out-Out! नाट्यमय घडामोडींमुळे Rohit Sharma चा चढला पारा; २ चेंडूंत २ सिक्स मारल्यावर नेमकं काय घडलं

Rohit Sharma Wicket in India vs Bangladesh 2nd Test: कानपूर कसोटीत रोहित शर्माची विकेट नाट्यपूर्ण ठरली. त्याने सगल दोन षटकारांसह आक्रमक सुरुवात केली होती. त्याने छोटेखानी पण आक्रमक खेळी या सामन्यात केली.

Pranali Kodre

India vs Bangladesh, 2nd Test: कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश संघात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील दुसरा आणि तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यानंतर आता चौथ्या दिवसाचा खेळ सोमवारी सुरू आहे.

दरम्यान, या सामन्यातील केवळ दोन दिवस बाकी असल्याने भारतीय संघाकडून आक्रमक फलंदाजी पाहायला मिळत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माचाही आक्रमक अंदाज यावेळी पाहायला मिळाला.

बांगलादेश संघाचा पहिला डाव चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ७४.२ षटकात २३३ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात करण्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल आले. पहिले षटक पूर्ण जैस्वालने खेळून काढताना ३ चौकारांसह १२ धावा काढल्या.

त्यानंतर दुसऱ्या षटकात फलंदाजीसाठी रोहित शर्मा स्ट्राईकवर आला. त्याने त्याचा या षटकातील पहिलाच चेंडू खेळताना खलीद अहमदविरुद्ध लाँगऑनवरून षटकार ठोकला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवरही त्याने पुल शॉट खेळत षटकार मारला. त्याने त्याच्या खेळीची सुरुवातच २ षटकारांसह केली.

त्यानंतरही तो आक्रमक खेळताना दिसला. त्याने तिसऱ्या षटकारतही एक षटकार ठोकला. पण चौथे षटक त्याच्यासाठी नाट्यपूर्ण ठरले. त्याने मेहदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता. त्यानंतरच्या दोन्ही चेंडूवर त्याला एकही धाव काढता आली नाही.

यानंतर चौथ्या चेंडूंवर रोहितने पुल शॉटचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या पॅडवर आदळला. त्यामुळे बांगलादेशने अपील केले. त्यावर अंपायर रिचर्ड केटलबोरो यांनी त्याला पायचीत दिले. पण रोहितने फार वेळ न घालवता लगेचच DRS ची मागणी केली. यावेळी त्याची बॅट चेंडूला लागली नसल्याचे दिसले.

त्यानंतर तो पायचीत आहे का हे तपासण्यात आले. त्यामध्ये इम्पॅक्ट आऊटसाईड लेग-स्टंप असल्याने रोहितला नाबाद असल्याचे स्पष्ट दिसले. नाबाद असल्याचे दिसताच रोहित त्याला आधी बाद दिल्याबद्दल चिडताना दिसला.

यावेळी तो चिडून काहीतरी बोलतानाही दिसला. मात्र, यानंतर पुढच्याच चेंडूवर मेहदी हसन मिराजने रोहितला त्रिफळाचीत केले. त्यामुळे त्याला ११ चेंडूत २३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

दरम्यान, तो बाद झाल्यानंतरही यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी धावांची गती राखली होती. जैस्वालने ५१ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. गिलनेही ३६ चेंडूत ३९ धावा केल्या. नंतर आलेल्या ऋषभ पंत ९ धावांवरच बाद झाला. मात्र विराट कोहली आणि केएल राहुल यांनीही आक्रमक खेळ केला आणि भारताला २५ षटकांच्या आतच २०० च्या वर धावांचा टप्पा पार करून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BEST Election Results : बेस्ट पतपेढी निवडणुकीत उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव, मुंबई महापालिका निवडणुकीआधीच ठाकरे बंधुंना मोठा धक्का

Mumbai Rain Update: मुंबईत तिसऱ्या दिवशीही मुसळधार, लोकल सेवेचा खोळंबा, अनेक गाड्या रद्द, चाकरमान्यांचे हाल

Shivaji Maharaj : काय होता शिवरायांचा संतुलित आहार? युद्धासाठी नेहमी तंदुरुस्त राहण्यामागचं खरं रहस्य! आजच्या पिढीसाठी प्रेरणा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्याला झटपट बनवा चवदार ज्वारीची उकडपेंडी, सोपी आहे रेसिपी

MP Udayanraje Bhosale: उरमोडी प्रकल्प विस्ताराला केंद्राचा हिरवा कंदील: उदयनराजे भोसले; 'जल आयोगाकडून ३०४२.६७ कोटींचा निधी मंजूर'

SCROLL FOR NEXT