Sachin Tendulkar esakal
Cricket

Virat Anushka Baby Boy : त्याच्या नावासारखंच... विराट अन् अनुष्काला पुत्ररत्न होताच सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

Sachin Tendulkar Reaction On Virat Kohli Anushka Sharma Blessed Baby Boy : सचिन तेंडुलकरने विराट आणि अनुष्काला पुत्रप्राप्ती झाल्यावर ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या.

अनिरुद्ध संकपाळ

Sachin Tendulkar Reaction On Virat Kohli Anushka Sharma Blessed Baby Boy : व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 फेब्रवारीला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्माला लंडनमध्ये पुत्रप्राप्ती झाली. याची माहिती अनुष्का आणि विराटने पाच दिवसांनी म्हणजे 20 जानेवारीला सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली.

माध्यमांमध्ये अनुष्का आणि विराटला काही दिवसातच दुसरं अपत्य होण्या असल्याचे वृत्त आलं होतं. विराट कोहलीने इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतून अचानक माघार घेतली होती. त्यावेळी त्याने माघारीचे कारण गुलदस्त्यात ठेवले होते. अखेर हे गोड कारण समोर आलं आहे.

दरम्यान, विराट आणि अनुष्काने ही गोड बातमी शेअर केल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील या दोघांचे अभिनंदन करत एक खास पोस्ट लिहिली.

सचिन तेंडुलकर आपल्या ट्विटमध्ये (एक्स) म्हणतो, 'विराट आणि अनुष्काचं अभिनंदन! अकाय हा तुमच्या कुटुंबात दाखल झालेलं मैल्यवान रत्न आहे. त्याच्या नावासारखंच त्याच्या येण्याने संपूर्ण घर उजळून निघालं असेल. तुमच्या आयुष्यात अमर्याद आनंद आणि हास्य येवो हीच प्रार्थना. या जगात लिटिल चॅम्पचं स्वागत.'

विराट कोहलीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झाल्याची माहिती दिली होती. तो पोस्टमध्ये म्हणतो की, 'तुम्हा सर्वांना सांगण्यास आनंद होत आहे की 15 फेब्रुवारीला आम्हाला पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. अकाय वामिकाचा छोट्या भावाचे या जगात आगमन झालं आहे हे सांगाता आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT