Sanath Jayasuriya Sri Lanka Coach sakal
Cricket

SL vs IND : भारत-श्रीलंका मालिकेपूर्वी बोर्डाने केली मोठी घोषणा! माजी सलामीवीरची कोच म्हणून नियुक्ती

Sri Lanka Cricket Team Head Coach : भारत-श्रीलंका टी-20 आणि एकदिवसीय मालिकेपूर्वी बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.

Kiran Mahanavar

Sanath Jayasuriya Sri Lanka Coach : भारताविरुद्धच्या आगामी टी-20 आणि एकदिवसीय मालिकेपूर्वी श्रीलंकेने मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेने संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी सनथ जयसूर्याची नियुक्ती केली आहे. ख्रिस सिल्व्हरवुडने टी-20 वर्ल्ड कपमधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर आता जयसूर्याला संघाचे अंतरिम प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.

2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या संघाची कामगिरी चांगली राहिली नव्हती. संघाने गट टप्प्यात एकूण 4 सामने खेळले, त्यापैकी फक्त 1 सामना जिंकला आणि 2 सामने गमावले. पावसामुळे एका सामन्याचा निकाल लागला नाही. यानंतर मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कुटुंबाचा हवाला देत त्याने श्रीलंकेच्या संघाचे प्रशिक्षकपद सोडण्याची घोषणा केली होती. यापूर्वी महेला जयवर्धने यांनीही क्रिकेट सल्लागार पदाचा राजीनामा दिला होता.

या दोन दिग्गजांच्या राजीनाम्यानंतर आता जयसूर्याकडे अंतरिम प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सल्लागार म्हणूनही तो संघासोबत होता आणि त्यामुळेच त्याला संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. श्रीलंकेचा संघ नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू ठेवणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT