Shaheen Afridi | Jasprit Bumrah | Sanjana Ganesan Sakal
Cricket

Jasprit Bumrah: 'फक्त एक गिफ्ट नव्हतं, तर...', बुमराहजवळ लेकासाठी शाहिन आफ्रिदीनं काय पाठवलेलं, संजना गणेशनचा खुलासा

Sanjana Ganesan: आशिया चषक 2023 दरम्यान शाहिन आफ्रिदीने जसप्रीत बुमराहजवळ त्याच्या मुलासाठी खास गिफ्ट दिलं होतं, याबाबतच संजना गणेशनने खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Shaheen Afridi : भारत विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारी (9 जून) टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सामना होणार आहे. न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.

दरम्यान, या सामन्यापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनने मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने काय भेट दिली होती, याबद्दल संजनाने सांगितले आहे.

जसप्रीत आणि संजना यांना सप्टेंबर 2023 मध्ये पुत्ररत्न प्राप्ती झाली होती. त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव अंगद असं ठेवलं आहे. अंगदच्या जन्मावेळी आशिया चषक 2023 स्पर्धा सुरू होती. दरम्यान, या स्पर्धेवेळी बुमराह जेव्हा मुलाच्या जन्मानंतर भारतीय संघात पुन्हा सामील झाला होता, त्यावेळी शाहिन आफ्रिदीने बुमराहजवळ एक त्याच्या मुलासाठी खास भेट दिली होती.

या भेटीबद्दल द ग्रेड क्रिकेटर युट्युब चॅनेलवर बोलताना संजनाने सांगितले की त्याने खूप सुंदर भेट दिली होती. ती एकच भेटवस्तू नव्हती, तर त्यात अनेक गोष्टी होत्या. त्यातील बऱ्याच गोष्टी अजूनही अंगद वापरतो.

तसेच तिने असेही म्हटले की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील स्पर्धा मैदानात ठीक आहे, परंतु मैदानाबाहेर हे बरोबर नाही.

दरम्यान, ज्यावेळी शाहिन आफ्रिदीने बुमराहला भेट दिली होती, त्याची मोठ्याप्रमाणात चर्चा झालेली इतकेच नाही, तर त्याचे कौतुकही झाले होते.

भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने

आता टी20 वर्ल्ड कप 2024 दरम्यान भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. यावेळी बुमराह आणि शाहिन आफ्रिदीही आमने-सामने असतील. हा सामना रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे.

हा सामना या स्पर्धेतील दोन्ही संघांचा प्रत्येकी दुसरा सामना आहे. पाकिस्तानने त्यांच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव स्विकारला आहे, तर भारताने आयर्लंडविरुद्ध पहिला सामना जिंकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Flood: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर! मिठी नदीत तरूण वाहून जाताना व्हिडिओ समोर तर एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Donald Trump: अमेरिकेत ट्रम्प यांचा थेट कारवाईचा निर्णय; रोजगार आकडेवारीवरून बीएलएस प्रमुखांना दिली हकालपट्टी

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : उजनीतून भीमा नदीत 11हजार 600 क्युसेक विसर्ग

PM Modi on Indus Water Treaty : 'सिंधू जल करार'वरून नेहरूंचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र, म्हणाले...

सुदर्शन विरुद्ध राधाकृष्णन! उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचा उमेदवार जाहीर, कोण आहेत बी सुदर्शन रेड्डी?

SCROLL FOR NEXT