Team India | T20 World Cup
Team India | T20 World Cup Sakal
क्रिकेट

T20 World Cup: हार्दिक अन् विराटला मिळणार नाही वर्ल्ड कप तिकीट? दिग्गज भारतीय खेळाडूच्या टीम इंडियाची घोषणा

प्रणाली कोद्रे

India Squad for T20 World Cup: टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा जूनमध्ये खेळवण्यात येणार आहे. आता जवळपास अवघा एकच महिना स्पर्धेला उरला आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी सहभागी संघबांधणीचा विचार करताना दिसत आहे. आगामी काही दिवसात या स्पर्धेसाठी भारतीय संघाचीही घोषणा होईल.

पण त्यापूर्वी भारतीय संघात कोणकोणत्या खेळाडूंना संधी द्यायला हवी याबाब अनेक माजी क्रिकेटपटू अंदाज व्यक्त करत आहेत. यात आता संजय मांजरेकरांचाही समावेश आहे.

मांजरेकरांनीही स्टार स्पोर्ट्सशी बोलताचा त्यांच्या अंदाजानुसार भारतीय संघात कोणाला संधी मिळू शकते, याची यादी जाहीर केली आहे. मात्र, त्यांनी निवडलेल्या भारतीय संघात विराट कोहली, हार्दिक पांड्या, शुभमन गिल आणि शिवम दुबे अशा काही चर्चेत असलेल्या खेळाडूंनाही संधी दिलेली नाही.

दरम्यान, सध्या आयपीएल 2024 मध्ये विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. असे असूनही मांजरेकरांनी त्याला संधी न दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. याशिवाय शिवम दुबेनेही या आयपीएलमध्ये अनेकांना प्रभावित केले आहे. परंतु, त्यालाही त्यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिलेली नाही.

मांजरेकर यांनी सलामी जोडी म्हणून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांची निवड केली आहे. तर संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, केएल राहुल या फलंदाजांनाही संघात निवडले आहे.

त्याचबरोबर अष्टपैलू रविंद्र जडेजालाही त्यांनी संधी दिली असून ऋषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून निवडले आहे. याशिवाय केएल राहुलही यष्टीरक्षणासाठी पर्याय असू शकतो.

गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज या अनुभवी खेळाडूंबरोबरच आयपीएल 2024 मध्ये प्रभावित करणाऱ्या अवेश खान, मयंक यादव आणि कृणाल पांड्यालाही त्यांनी निवडले आहे. मयंकने आयपीएल 2024 मध्ये आपल्या वेगाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने या आयपीएल हंगामातील सर्वात वेगवान चेंडूही फेकला आहे.

हा संघ घोषित करताना मांजरेकरांनी सांगितले की 'ही निवड करणे अत्यंत कठीण आहे, कारण सध्या देशात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. विशेषत: आयपीएलनंतर तुम्हाला अनेक पर्याय मिळतात. पण मी एक प्रयत्न करून पाहातो.'(Sanjay Manjrekar picks his India squad for T20 Cricket World Cup 2024)

संजय मांजरेकर यांची टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया -

  • रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अवेश खान, मयंक यादव आणि कृणाल पांड्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT