Sanju Samson | India vs Bangladesh 3rd T20I Sakal
Cricket

Sanju Samson Century: 6,6,6,6,6... बूमबूम सॅमसन! फक्त ४० चेंडूत ठोकलं शतक! हे रेकॉर्ड झाले ब्रेक

Sanju Samson Century Record: संजू सॅमसमनने बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात शतक ठोकत खास विक्रम केले आहेत.

Pranali Kodre

India vs Bangladesh T20I Record: भारत विरुद्ध बांग्लादेश संघातील टी२० मालिकेतील तिसरा सामना शनिवारी (१२ ऑक्टोबर) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे.

या सामन्यात भारतीय संघाकडून संजू सॅमसन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याकडून आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आहे. या सामन्यात सॅमसनकडून तर वादळी शतकही पाहायला मिळालं.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी अभिषेक शर्मासह सलामीला फलंदाजीला उतरलेल्या संजू सॅमसनने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. मात्र अभिषेक अखुड टप्प्याच्या चेंडूवर पुल शॉट खेळताना तिसऱ्याच षटकात ४ धावांवर बाद झाला.

पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने सॅमसनला तोलामोलाची साथ दिली. या दोघांनीही आक्रमक खेळताना पहिल्या ६ षटकातच भारताला ८२ धावांपर्यंत पोहचवलं. त्यानंतरही त्यांनी आक्रमक खेळ सुरू ठेवला होता.

१० व्या षटकात तर सॅमसनने सलग ५ षटकार ठोकले. त्याने रिशाद हुसैनच्या गोलंदाजीवर या षटकात पहिल्या चेंडूवर एकही धाव काढली नव्हती. मात्र त्याने पुढच्या पाचही चेंडूवर षटकार ठोकले आणि ३० धावा केल्या.

त्यामुळे त्याने एकाच षटकात भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांची बरोबरी केली. ऋतुराज आणि तिलक यांनी मिळून २०२३ मध्ये गुवाहाटी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ग्लेन मॅक्सवेलने गोलंदाजी केलेल्या एकाच षटकात ३० धावा फटकावल्या होत्या.

टी२० मध्ये भारतासाठी एकाच षटकात सर्वाधिक धावा

  • ३६ धावा - युवराज सिंग (वि. स्टूअर्ट ब्रॉड (इंग्लंड), २००७)

  • ३६ धावा - रोहित शर्मा - रिंकु सिंग (वि. करिम जनत (अफगाणिस्तान),२०२४)

  • ३० धावा - ऋतुराज गायकवाड - तिलक वर्मा (वि. ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)२०२३)

  • ३० धावा - संजू सॅमसन (वि. रिशाद हुसैन (बांगलादेश) २०२४)

  • २९ धावा - रोहित शर्मा (वि. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) २०२४)

४० चेंडूत ठोकलं शतक

सॅमसनने नंतर अवघ्या ४० चेंडूतच त्याचे शतक पूर्ण केले. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणारा भारताचा दुसरा, तर आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या देशांच्या खेळाडूंमधील एकूण तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे.

यापूर्वी ३५ चेंडूत शतक करण्याचा विक्रम डेव्हिड मिलर आणि रोहित शर्माच्या नावावर आहे. तर ३९ चेंडूत जॉन्सन चार्ल्सच्या नावावर आहे.

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक (आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेले संघ)

  • ३५ चेंडू - डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांग्लादेश, २०१७)

  • ३५ चेंडू - रोहित शर्मा (भारत विरुद्ध श्रीलंका, २०१७)

  • ३९ चेंडू - जॉन्सन चार्ल्स (वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०२३)

  • ४० चेंडू - संजू सॅमसन (भारत विरुद्ध बांगलादेश, २०२४)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT