Rishabh Pant | Sanju Samson | Ishan Kishan Sakal
Cricket

Ishan Kishan घेणार ऋषभ पंतची जागा, IND vs BAN मालिकेसाठी टीम इंडियात होणार पुनरागमन?

Sanju Samson, Ishan Kishan in Contention for Wicket-Keeper Spot: भारत विरुद्ध बांगलादेश संघात कसोटी मालिकेनंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात टी२० मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी इशान किशनला भारतीय संघात स्थान मिळू शकते.

Pranali Kodre

India vs Bangladesh T20I Series: बांगलादेश क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश संघात तीन सामन्यांची टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे.

या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची निवड झालेली नाही. पण लवकरच या मालिकेसाठीही निवड जाहीर होऊ शकते. दरम्यान, या मालिकेत युवा खेळाडू खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार ऋषभ पंतला टी२० मालिकेसाठी निवड समिती विश्रांती देण्याची शक्यता आहे. कारण आगामी काळात भारताला आणखी ८ कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट केले जात आहे. याचकारणाने पंतला या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.

गेल्या काही मालिकांपासून टी२० मध्ये संजू सॅमसनही यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आणखी एक पर्याय भारतीय संघाकडे आहे. त्यामुळे त्याला बांगलादेशविरुद्धच्या टी२० मालिकेसाठीही भारतीय संघात कायम करण्यात येऊ शकते.

याबरोबरच आता असे रिपोर्ट्स समोर आले आहेत की इशान किशन यालाही सॅमसनबरोबर बांगलादेशविरुद्धच्या टी२० मालिकेत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. असे झाले, तर इशान जवळपास वर्षभराने भारतीय संघात पुनरागमन करेल.

त्याने २०२३ च्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटही खेळण्यास नकार दिलेला. त्यामुळे त्याला वार्षिक करारातूनही बीसीसीआयने काढले होते. पण त्यानंतर त्याने आता पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.

इशान किशन आयपीएल २०२४ मध्ये खेळला. त्यानंतर त्याने बुची बाबू स्पर्धाही खेळला. त्याला दुलीप ट्रॉफीमध्येही खेळण्याची संघी मिळाली, ज्यात त्याने चांगली कामगिरी केली. त्याने एक शतकही या स्पर्धेत केले. आता त्याची निवड इराणी कप स्पर्धेतही शेष भारत संघात झाली आहे.

इराणी कप स्पर्धेचा सामना १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान लखनौला होणार आहे. त्यामुळे आता हे पहावे लागणार आहे की बांगलादेशविरुद्ध ६ ऑक्टोबरपासून चालू होणाऱ्या टी२० मालिकेसाठी त्याची निवड होणार का?

जर इराणी कपमध्ये त्याच्याऐवजी ध्रुव जुरेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले, तर त्याला टी२० मालिकेसाठी मुक्त केले जाऊ शकते. आता यावर बीसीसीआय निवड समिती काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.

याबरोबरच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला देखील या मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. तो देखील भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. त्यामुळे आगामी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेच्या दृष्टीने त्यालाही विश्रांती दिली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT