Sarfaraz Khan Yashasvi Jaiswal eSakal
Cricket

Sarfaraz Khan Yashasvi Jaiswal : यशस्वीचं द्विशतक अन् सर्फराजचं तुफानी सेलिब्रेशन... का होतोय तो व्हिडिओ व्हायरल ?

Sarfaraz Khan Yashasvi Jaiswal Video : सर्फराज खानच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Sarfaraz Khan Yashasvi Jaiswal : भारताने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 434 धावांनी पराभव करत मालिकेत 2 - 1 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने 214 धावांची द्विशतकी खेळी केली. यशस्वीने द्विशतक ठोकल्यानंतर त्याचा पार्टनर सर्फराज खानचा आनंद गगनात मावत नव्हता.

यशस्वीचे हे सलग दुसरे द्विशतक होते. यापूर्वी शुभमन गिलने देखील 91 धावांची दमदार खेळी केली होती. मात्र 91 धावांवर तो धावबाद झाला. मात्र सर्फराजने असा काही प्रकार यशस्वीच्या बाबतीत होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली.

पहिल्या डावात रविंद्र जडेजा शतकी धाव घेताना गोंधळला अन् सर्फराज खान धावबाद झाला होता. मात्र दुसऱ्या डावात सर्फराज खानने यशस्वीच्या द्विशतकासाठी कोणतीही रिस्क घेतली नाही. सर्फराज खानने यशस्वी जैस्वाल द्विशतकाच्या उंबरठ्यावर पोहचला होता त्यावेळी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाच नाही. यामुळे यशस्वी सर्फराजवर वैतागला देखील होता.

मात्र अखेर जो रूटच्या चेंडूवर यशस्वीने आपले द्विशतक पूर्ण केले अन् यशस्वी सोबतच सर्फराज खानने देखील सेलिब्रेशन केलं. या क्षणाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. सर्फराजच्या या सेलिब्रेशनमुळे यशस्वीच्या द्विशतकाचा आनंद द्विगुणित झाला हे मात्र नक्की.

शुभमन गिल 91 धावांवर बाद झाल्यानंतर रिटायर्ड हर्ट झालेला यशस्वी जैस्वाल पुन्हा मैदानावर उतरला. त्याने सर्फराज खानसोबत पाचव्या विकेटसाठी 172 धावांची आक्रमक भागीदारी रचली. सर्फराज खानने 72 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली. पदार्पण करणाऱ्या सर्फराज खानने पहिल्या डावात देखील 62 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT