Sarfaraz Khan esakal
Cricket

IND vs ENG 5th Test : जास्तच उड्या मारतोय... विराटचा वारसा सर्फराजने चालवला; गिलसाठी बेअरस्टोला भिडला

अनिरुद्ध संकपाळ

Jonny Bairstow Sarfaraz Khan Banter During Match : भारताने पाचव्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव करत 5 कसोटी सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा संघाने अनेक दिग्गजांच्या अनुपस्थितीत दमदार कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली.

भारतीय कसोटी संघातील हेच युवा खेळाडू मैदानावरील कामगिरीसोबतच स्लेजिंगमध्ये देखील मागे राहिले नाहीत. सर्फराज खानने ते विराट कोहलीचाच वारसा पुढे चालवला. भारताच्या ध्रुव जुरेल, शुभमन गिल आणि सर्फराज खानने जॉनी बेअरस्टोला चांगलेच शाब्दिक फटके दिले. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

जॉनी बेअरस्टो फलंदाजीला आल्यानंतर स्लिपमध्ये असलेला शुभमन गिल, विकेटकिपर ध्रुव जुरेल आणि शॉर्ट लेगला उभा असलेला सर्फराज खान यांनी बेअरस्टोची चांगलीच खेचली.

जॉनी बेअरस्टो शुभमन गिलला म्हणाला की, जिमीने (अँडरसन) ला तुला कंटाळा येत असल्याबद्दल काही सांगितलं आणि त्याने तुला बाद केलं ना?

त्यावर गिल म्हणाला की, 'म्हणून काय झालं ते माझ्या शतकानंतर झालं तू किती धावा केल्या आहेस इथं?

गिल आणि बेअरस्टोच्या शाब्दिक वादात शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या सर्फराज खानने देखील उडी घेतली. तो हिंदीत म्हणाला की, 'थोड्या धावा काय केल्या जास्तच उड्या मारत आहे.'

जॉनी बेअरस्टोने दुसऱ्या डावात 31 चेंडूत 39 धावा केल्या. त्याची ही 100 वी कसोटी होती. त्याने जो रूटसोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. त्याने अश्विनला तीन षटकार मागले. मात्र त्याची शिकार कुलदीप यादवनेच केली.

बेअरस्टोला यंदाच्या मालिकेत फार चमकदार कामगिरी करता आली नाही. तो आक्रमक खेळला मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. त्याने स्लिपमध्ये उभ्या असलेल्या गिलची छेड काढली अन् या शाब्दिक बाचाबाचीत त्याची एकाग्रता भंगली. त्याचा फटका त्याला अन् संघाला देखील बसला.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी बीएमसीची दिवाळी भेट! ४२६ सदनिकांच्या विक्री प्रक्रियेला सुरूवात होणार? अर्ज कधी आणि कुठे करायचा?

Electric car caught fire Video : भररस्त्यात पेटली इलेक्ट्रिक SUV कार; दरवाजे झाले लॉक अन् ड्रायव्हर जिवंत जळाला!

सायन रुग्णालयात नोव्हेंबरपासून बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी विस्तारित केंद्र सुरू, प्रत्यारोपण क्षमता वाढणार

Supreme Court: पत्नीने नवऱ्याला भोवऱ्यासारखा फिरवू नये, घरात भांडण होत असतील तर... सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय काय?

Silver Price: चांदीच्या किंमती एवढ्या का वाढल्या? कारणं कोणती? भविष्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

SCROLL FOR NEXT