ICC T20WC esakal
Cricket

Women’s T20I World Cup Semi Final Scenario: न्यूझीलंडचा पराभव, टीम इंडियाला मिळाला आधार! ऑस्ट्रेलियाचे मानायला हवे आभार

Team India WC Semi Final Scenario: भारतीय संघाने पहिल्या लढतीतीत पराभवानंतर महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पुनरागमन करताना पाकिस्तानला पराभूत केले. या विजयाने भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत आणि त्यात आता न्यूझीलंडच्या पराभवाने नवी संधी मिळाली आहे.

Swadesh Ghanekar

Team India women's T20 World Cup Semi Final Scenario: हरमनप्रीत कौर आणि टीम आज महिला वर्ल्ड कप स्पर्धेत आशियाई विजेत्या श्रीलंकेचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. भारताला महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या लढतीत न्यूझीलंडकडून हार मानावी लागली आणि त्यामुळे अ गटातील त्यांचा नेट रनरेट प्रचंड घसरला. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवून नेट रनरेटमध्ये सुधारणा करण्याची संधी हरमनप्रीत कौर अन् टीमने गमावली. त्यामुळे उपांत्य फेरीत जाण्यासाठी स्वतःच्या कामगिरीसह इतरांवरही टीम इंडियाला अवलंबून रहावे लागणार हे स्पष्ट झाले. त्यासाठीचा महत्त्वाचा निकाल काल लागला.

न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात करत आव्हान कायम राखले. आज होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत भारताला फलंदाजी सुधारण्याचे अन् नेट रनरेट (सरासरी) वाढवण्याचे. या दोन बाबींमध्ये लक्षणीय कामगिरी केली नाही आणि पराभव झाला, तर मात्र भारतीय महिला संघाचे आव्हान साखळीतच संपुष्टात येऊ शकते. पण, त्याआधी न्यूझीलंडच्या पराभवाने भारताच्या आशांना बळ मिळाले आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलग १३ वा विजय...

ऑस्ट्रेलियन महिला संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग १३वा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने ८ बाद १४८ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडला त्यांनी ८८ धावांवर ऑलआऊट केले. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मूनी ( ४०), एलिसे पेरी ( ३०) व एलिसा हिली ( २६) या आघाडीच्या तिन्ही फलंदाजांनी चांगली खेळी केली. न्यूझीलंडकडून सुझी बॅट्स ( २०) व एमिली केर ( २९) या वगळल्यास इतरांनी निराश केले. मीगन शटने ३.२-१-३-३ अशी स्पेल टाकून इतिहास रचला. महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ३ विकेट्स मिळवल्यानंतर हा सर्वात चांगला इकॉनॉमिकल स्पेल ठरला. यापूर्वी २०१४ मध्ये इंग्लंडच्या डॅनिएल हॅझलने ४ धावांत ३ विकेट्स घेत विंडीजला धक्का दिला होता.  

भारताला फायदा कसा झाला?

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा विजय मिळवून ४ गुण व २.५२४ नेट रनरेटसह अव्वल स्थानावर झेप घेतली. पाकिस्तान २ सामन्यांत १ जीत व १ हार अशा निकालसह दुसऱ्या, तर न्यूझीलंडही याच निकालसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडचा नेट रनरेट -०.०५० असा घसरला आहे. भारतीय संघाचा नेट रनरेट -१.२१७ असा असला तरी आज श्रीलंकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवून यामध्ये सुधारणेची संधी आहे. पण, तरीही अन्य निकालांवरही बरंच काही अवलंबून आहे.

ICCT20WCStanding

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT