Ranji Trophy sakal
Cricket

Ranji Trophy : महाराष्ट्राच्या संघाचा पाय खोलात ; सेना दलाकडे २०५ धावांची आघाडी

यंदाच्या रणजी क्रिकेट करंडकातील मोसमात बाद फेरीपासून दूर झालेल्या महाराष्ट्राच्या संघाचा पाय खोलात गेला आहे. सेना दल संघाविरुद्धच्या ‘अ’ गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत महाराष्ट्र संघ बॅकफूटवर फेकला गेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : यंदाच्या रणजी क्रिकेट करंडकातील मोसमात बाद फेरीपासून दूर झालेल्या महाराष्ट्राच्या संघाचा पाय खोलात गेला आहे. सेना दल संघाविरुद्धच्या ‘अ’ गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत महाराष्ट्र संघ बॅकफूटवर फेकला गेला आहे.

महाराष्ट्राच्या संघाला पहिल्या डावात २२५ धावांवर गुंडाळल्यानंतर सेना दल संघाने तिसऱ्या दिवसअखेरीस ९ बाद ४३० धावा केल्यामुळे आता त्यांच्याकडे २०५ धावांची आघाडी आहे. या लढतीचा अखेरचा दिवस उद्या (ता. १९) असणार आहे. सेना दल संघाने ४ बाद २१७ या धावसंख्येवरून रविवारी पुढे खेळायला सुरुवात केली. रजत पलिवाल व नकुल शर्मा या जोडीने १०८ धावांची भागीदारी करताना सेना दलासाठी मोलाची कामगिरी बजावली.

हितेश वाळुंजच्या गोलंदाजीवर रजत ५१ धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने सात चौकार मारले. त्यानंतर नकुल याने शतकाकडे कूच केली, पण कौशल तांबेच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. ८७ धावांच्या खेळीत त्याने ८ चौकार व ३ षटकार मारले. सेना दलाच्या तळाच्या फलंदाजांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावले.

पुल्कीत नारंग याने २७ धावांची, अर्जुन शर्माने नाबाद ४३ धावांची, पूनम पुनियाने २६ धावांची खेळी केली. सेना दल संघाने तिसऱ्या दिवसअखेरीस ९ बाद ४३० धावा फटकावल्या. तरणजीत ढिल्लो याने १२९ धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र- पहिला डाव २२५ धावा, वि. सेना दल - पहिला डाव ९ बाद ४३० धावा (शुभम रोहिला ७२, रजत पलिवाल ५१, नकुल शर्मा ८७, तरणजीत ढिल्लो ४/१२९).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय? आज सायंकाळपर्यंत येणार डीजीसीएचा रिपोर्ट

Ramadan Inspiring Child Story : बाप रे! इतक्या लहान वयात कडक उपवास? फातिमाच्या 'त्या' निर्णयाने जळगावकर थक्क; पाहा नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : औंढा नागनाथ मंदिर दर्शनासाठी बंद

दिग्गज अभिनेत्याचा शेवटचा सिनेमा ठरला फ्लॉप, आता OTT वर ट्रेंडिंगमध्ये, चित्रपट पाहून डोळ्यात येईल पाणी

Nano Banana 2 झाले लाँच! फ्रीमध्ये तुमच्या फोटोला द्या नवा ट्रेंडी लुक, गुगल जेमिनीवर कॉपी-पेस्ट करा 'हे' 5 बेस्ट प्रॉम्प्ट

SCROLL FOR NEXT