Abhishek Nayar Cricket  esakal
Cricket

Abhishek Nayar : क्रिकेटमध्ये सेक्स... अँकरने विचारला पर्सनल प्रश्न अन् KKR कोच अभिषेकनं दिलं भन्नाट उत्तर

Abhishek Nayar KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरनं भारताच्या अनेक युवा खेळाडूंना चांगलं मार्गदर्शन केलं आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Abhishek Nayar Cricket Sex : आयपीएल 2024 च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने आपलं तिसरं विजेतेपद पटकावलं. यानंतर केकेआरच्या कोचिंग टीममधील एक महत्वाचा व्यक्ती अभिषेक नायरची यूट्यूबर रणवीर अलाहबादियाने मुलाखत घेतली. या मुलाखतीत अभिषेक नायरला रणवीरने अनेक भन्नाट प्रश्न विचारले.

रणवीरने अभिषेकला क्रिकेटमध्ये सेक्सची भुमिका काय आहे. खेळाडूंच्या जिवनावर याचा कसा परिणाम होतो असा प्रश्न विचारला.

या प्रश्नाचं उत्तर देताना अभिषेक म्हणाला की, 'हा प्रश्न तुम्ही सकारात्मक स्वरूपात विचारत आहात की नकारात्मक स्वरूपात? तुम्ही खूप ओपन एन्डेड प्रश्न विचारला आहे. कोणताही व्यक्ती याच्याशिवाय कसं राहू शकतो. हे चांगली की वाईट हा तुमचा प्रश्न आहे किंवा तुम्हाला हे किती प्रमाणात होतं असं विचारायचं आहे?

अभिषेकचं भन्नाट उत्तर

अभिषेक यानंतर पुढे म्हणाला की, 'मी या प्रश्नाचे उत्तर देऊ इच्छितो. मात्र त्यानंतर यावर तुमचं उत्तर काय येतं हे देखील मला जाणून घ्यायचं आहे. कोणासाठी देखील ही गोष्ट खूप सामन्य आहे. प्रत्येकासाठी ही गोष्ट खूप वेगळी असते. प्रत्येक क्रिकेटपटूच्या डोक्यात या विषयाला घेऊन सतत एक लाढाई सुरू असते. तो द्विधा मनस्थितीत असतो. काहींना ही गोष्ट चांगली वाटेल, काहीजण यापासून दूर राहतील. याचा एक असा नियम नाहीये.'

अभिषेकने केकेआरच्या युवा खेळाडूंवर केलं काम

अभिषेक नायरनं केकेआरच्या युवा खेळाडूंवर प्रचंड काम केलं आहे. अभिषेक हा सहाय्यक कोच आहे. त्याचबरोबर तो केकेआरच्या क्रिकेट अकादमीचा मुख्य प्रशिक्षक आहे. अंग्रिश रघुवंशी या युवा भारतीय खेळाडूच्या वडिलांनी इन्स्टाग्रावरून नायरचे आभार मानले होते.

त्यांनी लिहिलं की, 'प्रिय अभिषेक सर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट सांगितली होती. तुम्ही अंग्रिशला आधी चांगला व्यक्ती आणि त्यानंतर चांगला क्रिकेटर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं होते. असं वाटतंय की तुमची योजना काम करत आहे.'

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT