shahid Afridi on CT26 sakal
Cricket

सुरक्षा, हे फक्त निमित्त! Shahid Afridi बरळला, पाकिस्तान दौऱ्यावर न येणाऱ्या भारताला सुनावलं

Shahid Afridi on CT 25 - पुढल्या वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी BCCI ने टीम इंडियाला न पाठवण्याचा निर्णयावर माजी कर्णधार संतापला आहे.

Swadesh Ghanekar

Shahid Afridi on Champions Trophy 2025 - भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी पाकिस्तानात जाणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) याबाबतचा चेंडू ICC च्या कोर्टात टोलवला आहे. त्यात BCCI ने आशिया चषक २०२३ प्रमाणे चॅम्पियन्स ट्रॉफीही हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या सर्व घडामोडींमुळे पाकिस्तानी माजी खेळाडू खवळले आहेत आणि त्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याचाही समावेश आह

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू आफ्रिदीने पाकिस्तानात खेळण्यासाठी न येणाऱ्या भारतीय संघाला सुनावले आहे. स्पोर्ट्स तकनुसार, आफ्रिदीने दावा केला की, यापूर्वी धमक्या मिळाल्या असतानाही पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर गेला होता. भारत सुरक्षेचा बहाणा करत आहे आणि जर त्यांना पाकिस्तानला यांयचेय असेल तर ते येतील.

“आम्ही अनेक वेळा कठीण परिस्थितीत भारतात गेलो आहोत. आम्हाला धमक्या मिळाल्या तरीही भारतात गेलो. आम्ही त्यांचा हेतू जाणून घेऊ. आम्ही नेहमीच भारताला पाठिंबा दिला आहे. आम्हाला धमक्या आल्या पण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि सरकारने नेहमीच पुढाकार घेतला , ” असा दावा अफ्रिदीने केला आहे.

पाकिस्तानने २०२६ वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. ही स्पर्धा भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने खेळवण्यात येणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान होणार आहे.

पाकिस्तानला पुन्हा भारतात यावं लागणार...

आशियाई क्रिकेट परिषदेची ( ACC) वार्षिक सर्वसाधारण बैठक श्रीलंकेत काल पार पडली. ACC ने जाहीर केलेल्या निवेदनानुसार भारतात २०२५ च्या आशिया चषक २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे आणि ही स्पर्धा ट्वेंट-२० फॉरमॅटमध्ये होणार आहे. त्यासाठी पाकिस्तानला पुढच्या वर्षी पुन्हा एकदा भारतात यावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT