Shahid Afridi - Shaheed Afridi Sakal
Cricket

Shahid Afridi: 'बदल करायचाच होता, तर...' जावयाची कर्णधारपदावरून हाकालपट्टी होताच शाहिद आफ्रिदीची PCB वर टीका

Pakistan Cricket Captain: पाकिस्तानच्या टी20 संघाच्या कर्णधारपदी शाहिन आफ्रिदीच्या जागेवर पुन्हा एकदा बाबर आझमची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत शाहिद आफ्रिदीने पोस्ट केली आहे.

Pranali Kodre

Shahid Afridi Post: पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसात मोठे बदल घडताना दिसत आहेत. त्यातच रविवारी (31 मार्च) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझमकडे पुन्हा एकदा वनडे आणि टी20 क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली. यावर आता माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आश्चर्य व्यक्त केले आहे.

खरंतर 2023 वर्ल्डकपनंतर बाबर आझमने कसोटी, वनडे आणि टी20 अशा तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारातील पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोडले होते.

त्यानंतर टी20 संघाच्या नेतृत्वाची धुरा शाहिन आफ्रिदीकडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व शान मसूदकडे सोपवण्यात आले होते. त्याचबरोबर वनडेत मात्र अद्याप कोणालाही ही जबाबदारी दिली नव्हती.

दरम्यान, शाहिन आफ्रिदीच्या नेतृत्वात पाकिस्तानला टी20मध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर आता पाकिस्तानने काही महिन्यातच त्याला हटवून बाबर आझमला आगामी टी20 वर्ल्डकपपूर्वी पुन्हा कर्णधार केले.

या सर्व घटनांवर आता शाहिद आफ्रिदीने पोस्ट शेअर केली आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की शाहिन शाहिदचा जावई आहे.

शाहिद आफ्रिदीने लिहिले, 'निवड समितीतील खूप अनुभवी क्रिकेटपटूंकडून घेण्यात आलेल्या निर्णयाने मी चकीत झालो आहे. मला अजूनही असे वाटते की जर बदलाची गरजच होती, तर रिझवान सर्वोत्तम पर्याय होता. पण आता निर्णय झाला आहे, तर मी त्याला पूर्ण पाठिंबा देईल. माझ्या पाकिस्तान संघाला आणि बाबर आझमला शुभेच्छा आहेत.'

दरम्यान, टी20 वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध 5 टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. तसेच आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धही टी20 मालिका खेळायची आहे. त्यामुळे या मालिकांमध्ये बाबर आझम पाकिस्तानचे नेतृत्व करताना दिसेल.

यापूर्वी बाबर आझमने टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे 71 टी20 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. त्यातील 42 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 23 सामन्यांत पराभव स्विकारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT