Shan Masood and Abdullah Shafique esakal
Cricket

PAK vs ENG: फ्लॅट खेळपट्टीवर Shan Masood, अब्दुल्ला शफीकचे शतक; पण बाबर आझम पुन्हा अपयशी

PAK vs ENG Test series: इंग्लंडविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाअंती पाकिस्तानने ४ विकेट्स गमावत ३२८ धावा धावफलकावर लावल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Shan Masood and Abdullah Shafique Century: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात फ्लॅट खेळपट्टीवर पाकिस्तानी फलंदाजानी इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुवा उडवला आहे. पाकिस्तानी सलामीवीर अब्दुल्ला शफीक आणि कर्णधार शान मसूदने पहिल्या डावात शतक झळकावले तर, बाबर आझमच्या पदरी पुन्हा अपयश आले आहे. पाकिस्तानने पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवसात ४ विकेट्स गमावत ३२८ धावा उभारल्या .

पाकिस्तान इंग्लंडदरम्यानच्या ३ कसोटी सान्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. पाकिस्तानमधील मुल्तान क्रिकेट स्टेडीयवर सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाचा निर्णय घेतला. घरच्या मैदानावरील अनुभवामुळे पहिल्या दिवशी इंग्लीश गोलंदाजांना पाकिस्तानी फलंदाजांनी भांबावून सोडले.

तिसऱ्या षटकात गस ॲटकिंन्सनने युवा खेळाडू सईम आयुबला माघारी पाठवून पाकिस्तानला पहिला झटका दिला. परंतु सलामीवीर अब्दुल्ला शफीक आणि कर्णधार शान मसूदने इंग्लंडच्या गोलंदाजांना हैरान करून सोडले. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी २५३ धावांची मोठी भागिदारी केली. दोघांनीही डावात शतक झळकावले. पुढे ६०व्या षटकात ॲटकिंन्सनच्या गोलंदाजीवर झेलबाद होत शफीक परतला. शफीकने आपल्या खेळीदरम्यान २ षटकार व १० चौकारांसह १०२ धावा जोडल्या.

लगेचच ६३व्या षटकात जॅक लीचच्या गोलंदाजीवर शान मसूद परतला. मसूदने आक्रमक फलंदाजी करत १७७ चेंडूत १५१ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने १३ चौकार व २ षटकार ठोकले.

बाबर आझमकडून पाकिस्तानला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु, बाबर ३० धावांवर खेळत असताना ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर पायचीत झाला आणि त्याने चाहत्याना पुन्हा एकदा निराश केले. सध्या साउद शकील ३० धावांवर नाबाद आहे. तर नसीम शाह नुकताच फलंदाजीसाठी आला आहे. पहिल्या दिवसाअंती पाकिस्तानने ४ विकेट्स गमावत ३२८ धावा धावफलकावर लावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT