Pakistan Team Coach Latest Marathi News sakal
Cricket

Pakistan Team Coach : पाकिस्तान संघ आला रडकुंडी, मिळत नाही नवीन कोच; वॉटसन अन् 'या' दिग्गजाने नाकारली ऑफर

वॉटसनला पाकिस्तानी संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवले जाऊ शकते, अशा बातम्या याआधी मीडिया रिपोर्ट्समध्ये आल्या होत्या. मात्र आता या बातम्यांना पूर्णविराम लागला आहे.

Kiran Mahanavar

Pakistan Team Coach : ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. वॉटसनला पाकिस्तानी संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवले जाऊ शकते, अशा बातम्या याआधी मीडिया रिपोर्ट्समध्ये आल्या होत्या. मात्र आता या बातम्यांना पूर्णविराम लागला आहे. यासोबत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी यांनी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक बनण्याची ऑफर नाकारली आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (PBB) परदेशी कोचचा शोध अजूनही पूर्ण झालेला नाही.

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने पीसीबीला सांगितले की, मर्यादित षटकांच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून तो आधीच वेस्ट इंडिज बोर्डाशी करारबद्ध आहे. तर दुसरीकडे वॉटसन आपल्या प्रस्तावित पॅकेजमुळे नाराज असल्याची चर्चा पाकिस्तानी मीडियात आहे.

पीसीबीची ऑफर नाकारल्यानंतर वॉटसन शनिवारी रात्री घरी परतला. या घडामोडीची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की, पीसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीएसएल सामन्यांदरम्यान वॉटसनशी कराचीमध्ये दीर्घ चर्चा केली आणि त्याला मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर दिली.

तो म्हणाला की, 'वॉटसनने सुरुवातीला रस्य दाखवला होता आणि ऑफर स्वीकारण्यासाठी काही आर्थिक आणि इतर अटी ठेवल्या होत्या. बोर्डाने वॉटसनच्या आर्थिक मागण्या कमी प्रमाणात मान्य केल्यानंतर, त्याच्या प्रस्तावित पॅकेजचे तपशील पाकिस्तान मीडिया आणि सोशल मीडियावर लीक झाल्यामुळे माजी खेळाडू नाराज झाला.

आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) आणि मेजर क्रिकेट लीग (यूएसए) मध्ये समालोचक म्हणून पूर्वीच्या वचनबद्धतेचा उल्लेख करत वॉटसनने कोचची ऑफर नाकारली. यासोबतच त्याला सिडनीमध्ये आपल्या कुटुंबाला अधिक वेळ द्यायचा आहे.

पाकिस्तानी मीडियानुसार, पीसीबीने वॉटसनला वार्षिक दोन दशलक्ष डॉलर्स (सुमारे 16.60 कोटी भारतीय रुपये) देण्याचे मान्य केले होते. आता बोर्ड 14 एप्रिलपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी देशांतर्गत प्रशिक्षकाची नियुक्ती करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT