Yuvraj Singh | Shivam Dube Sakal
Cricket

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Shivam Dube on Comparison with Yuvraj Singh: युवराज सिंगबरोबर तुलना होण्याबाबत शिवम दुबेने बीसीसीआयशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Shivam Dube: आगामी टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी मंगळवारी (30 एप्रिल) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. 1 जून ते 29 जून 2024 दरम्यान अमेरिकेत आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघात शिवम दुबेलाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता टी२० वर्ल्डकप खेळण्याचं त्याचं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं.

दरम्यान, ही निवड झाल्यानंतर बीसीसीआयने त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो युवराज सिंगबरोबर होणाऱ्या तुलनेबाबत बोलला आहे.

तो म्हणाला, 'मी कधीही स्वत:ची त्याच्याशी तुलना केली नाही. मला वाटतं त्याच्याशी तुलना करणं मुर्खपणा आहे. माझी खेळण्याची स्टाईल थोडी त्याच्यासारखी आहे आणि मला चांगलं वाटतं की जेव्हा लोक मला याबद्दल सांगतात तेव्हा. पण मी जर त्यांच्याप्रमाणे थोडी जरी कामगिरी करू शकलो, तर माझ्यासाठी ते चांगले असेल.'

'मी जेव्हा भारतीय संघात आलेलो तेव्हा रवी भाईने (शास्त्री) मला सांगितलं होतं की तू युवी पाजीसारखे षटकार मारतो. मी युवी पाजीचे खूप सामने पाहिले आहेत. युवी पाजी पहिले ७-८ चेंडूत जरी मोठे शॉट्स खेळू शकले नाहीत, तरी ते नंतर सर्व कव्हर करायचे. त्या सर्व गोष्टी मी शिकलो आहे, मी मानसिकरित्या स्वत:ला तयार केलं.'

याशिवाय चेन्नई सुपर किंग्स संघात आल्याचाही फायदा झाल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला,'जेव्हा मी सीएसकेमध्ये आलो होतो, तेव्हा माही भाई आणि फ्लेमिंगने मला सांगितलेलं की मोठे शॉट्स खेळायचे. त्यांनी मला असं कधी सांगितलं नाही की पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळ, कारण ते जोखमीचं होऊ शकतं.'

'त्यामुळे माझ्या डोक्यात हे होतं की जर त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, तर मी पहिल्या १० चेंडूत जोखीम का घेऊ. मला असं वाटतं आता मी स्थिर झालो आहे. जेव्हा चेंडू बॅटवर लागतो तेव्हाच वाटून जातं की हा चेंडू लांब जाईल, षटकार जाईल. माझ्यात आत्मविश्वास येण्यासाठी मी सीएसकेचे आभार मानेल.'

त्याचबरोबर भारतीय संघातील निवडीबद्दल तो म्हणाला, 'खूप नर्वस आहे, रात्री झोपही नीट येत नाहीये. जेव्हा मला अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली होती, तेव्हा रोहितने मला सांगितलेलं की तू गोलंदाजी आणि फलंदाजीही करशील, फक्त तुला दाखवायचे आहे तू काय करू शकतो.'

'त्यामुळे मी त्यावरच लक्ष केंद्रित केलं. मी खेळेल की नाही, हा विचार करत नाही. मी फक्त हा विचार करतो की चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून देईल.'

दरम्यान, दुबेने यापूर्वी 21 आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळलेअसून २७६ धावा केल्या आहेत आणि ८ विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : सांगलीतून बाळाला उचललं अन् चिपळूणमध्ये एक लाख ८० हजारांना सौदा, पण माय लेकाच दोरी घट्ट होती...

Nagpur Farmer: ५६ हजारांवर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच; अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, दिवाळीनंतरही मदतीपासून वंचित

Latest Marathi News Live Update : बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सोयाबीन भिजले

कबाली हत्तीनं अडवला रस्ता, १८ तास वाहतूक ठप्प; वाहनांच्या रांगा, VIDEO VIRAL

AUS vs IND: जरा इकडे ये ऐक... विराट कोहलीने कॅप्टन शुभमन गिलला हात धरून मागे खेचलं अन् मग...; Video Viral

SCROLL FOR NEXT