Shreyas Iyer Dance| Ranji Trophy 2023-24 Final | Mumbai Cricket Sakal
Cricket

Shreyas Iyer: पाठदुखी विसरत श्रेयस अय्यरने धरला ढोलच्या तालावर ठेका, मुंबईच्या रणजी जेतेपदानंतरचा Video चर्चेत

Ranji Trophy 2023-24: मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर स्टेडियममध्ये वाजणाऱ्या ढोलच्या तालावर ठेका धरला होता.

सकाळ डिजिटल टीम

Shreyas Iyer Dance: रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेचे विजेतेपद अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने जिंकले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुरुवारी (14 मार्च) मुंबईने विदर्भाचा 169 धावांनी पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. मुंबईने विक्रमी 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरले.

मुंबईने 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर संघातील खेळाडूंनी मैदानावर मोठा जल्लोष केला. यावेळी स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी ढोलही आणले होते. त्यांनी मुंबई संघ जिंकल्यानंतर ढोल वाजवायला सुरुवात केली ते पाहून मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला नाचण्याचा मोह आवरता आला नाही.

श्रेयसने पाठदुखी विसरत स्टेडियमध्ये वाजत असलेल्या ढोलच्या तालावर ठेका धरला. याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, मुंबईकडून दुसऱ्या डावात अय्यर क्षेत्ररक्षणासाठी उतरला नव्हता. मीडियातील रिपोर्ट्सनुसार अय्यरला पाठिच्या दुखापतीचा त्रास होत आहे.

अय्यरला त्याच्या पाठीच्या दुखापतीने गेल्या अनेक दिवसांपासून त्रास दिला आहे. त्याच्यावर गेल्यावर्षी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर अनेकदा त्याला पाठदुखीचा त्रास उद्भवला आहे.

त्याने रणजी ट्रॉफीमध्ये उपांत्य फेरीतून मुंबई संघात पुनरागमन करण्यापूर्वीही पाठदुखीची तक्रार केल्याचे म्हटले जात होते. मात्र, बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला तंदुरुस्त असल्याचे म्हटले होते. त्यामुळे काही वादही समोर आले.

दरम्यान, अय्यर उपांत्य फेरीत फार कमाल करू शकला नव्हता. त्याने मुंबईने उपांत्य फेरीत तमिळनाडूविरुद्ध एका डावाने विजय मिळवलेला, या सामन्यात अय्यरला अवघे 3 धावाच करता आल्या होत्या.

अंतिम सामन्यातही विदर्भाविरुद्ध अय्यरने पहिल्या डावात 7 धावा केलेल्या. मात्र, दुसऱ्या डावात त्याने शानदार फलंदाजी केली. त्याने 111 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 95 धावांची खेळी केली होती. त्याचे शतक अवघ्या 5 धावांनी हुकले होते.

आता अय्यर रणजी ट्रॉफीनंतर आयपीएल 2024 स्पर्धा खेळताना दिसणार आहे. तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT