Shubman Gill Meets Robin Minz Father marathi news sakal
Cricket

Shubman Gill Meets Robin Minz Father : आदिवासी क्रिकेटपटूच्या वडिलांची शुभमन गिलने घेतली भेट...! व्हिडिओ होतोय व्हायरल

आयपीएल 2024 साठी डिसेंबरमध्ये झालेल्या मिनी लिलावात अनकॅप्ड खेळाडू रॉबिन मिन्झवर पैशांचा वर्षाव झाला.

Kiran Mahanavar

Shubman Gill meets Robin Minz's father : आयपीएल 2024 साठी डिसेंबरमध्ये झालेल्या मिनी लिलावात अनकॅप्ड खेळाडू रॉबिन मिन्झवर पैशांचा वर्षाव झाला. झारखंडच्या रॉबिन मिन्झला गुजरात टायटन्सने 3.6 कोटी रुपयांना विकत घेतले. या मिनी लिलावानंतर रॉबिन मिन्झचे वडील चर्चेत आले.

आता पुन्हा एकदा ते चर्चेत आहेत. खरंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने रॉबिन मिन्झच्या वडिलांची गुजरात विमानतळावर भेट घेतली. भारतीय संघातील प्रिन्स शुभमनने यावेळी त्याच्या वडिलांशी बराच वेळ चर्चा केली. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्याबद्दल रॉबिन मिन्झच्या वडिलांनी शुभमन गिलचे अभिनंदन केले. तसेच मिन्झला खरेदी केल्याबद्दल गुजरात टायटन्सचे आभार मानले.

शुभमन गिलनेही रॉबिन मिन्झच्या वडिलांशी हस्तांदोलन केले आणि मुलाच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यादरम्यान गिलने त्याच्यासोबत क्लिक केलेला फोटोही पाहायला मिळाला. रॉबिन मिन्झचे वडील निवृत्त लष्करी सैनिक आहेत. सध्या ते विमानतळ सुरक्षेत कार्यरत आहेत.

निडरपणे फलंदाजी करणारा रॉबिन मिन्झ हा आयपीएलमध्ये खेळणारा पहिला आदिवासी क्रिकेटपटू ठरणार आहे, हे विशेष. गेल्या दोन वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये रॉबिन मिन्झ चमकदार कामगिरी करत आहे.

यंदा मुंबई इंडियन्सने इंग्लंडमध्ये 30 खेळाडूंचे शिबिर आयोजित केले होते. रॉबिन मिन्झचा खेळ पाहिल्यानंतर त्याचाही या शिबिरात समावेश करण्यात आला. लिलावानंतर रॉबिन मिन्झच्या वडिलांनी सांगितले होते की, काही दिवसांपूर्वी त्यांनी महेंद्रसिंग धोनीची रांची विमानतळावर भेट घेतली होती. यावेळी, माजी भारतीय कर्णधाराने त्याला सांगितले होते की, जर कोणत्याही संघाने रॉबिन मिन्झला लिलावात खरेदी केले नाही, तर चेन्नई सुपर किंग्ज त्याला नक्कीच सामील करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT