Kane Williamson Sakal
Cricket

SL vs NZ 2nd Test : Kane Williamson सह न्यूझीलंडचे ३ फलंदाज ४ तासांत दोनवेळा OUT झाले, नेमकं काय घडलं ते वाचा

New Zealand 3 batsmen were out twice in a day against Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघावर मोठी नामुष्की ओढावली आहे. त्यांचे तीन फलंदाज तर एकाच दिवसात दोनदा बाद झाले.

Pranali Kodre

Sri Lanka vs New Zealand, 2nd Test: न्यूझीलंड संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू असून न्यूझीलंड संघ संघर्ष करताना दिसत आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली होती.

आता दुसऱ्या सामन्यात त्यांनी ५०० हून अधिक धावांची आघाडी घेत सामन्यात वर्चस्व मिळवले आहे. दरम्यान, या सामन्यात न्यूझीलंडचे तीन फलंदाज अवघ्या ४ तासात बाद झाल्याचे दिसून आले.

या सामन्यात श्रीलंकेने पहिला डाव ५ बाद ६०२ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर न्यूझीलंड संघ फलंदाजीला उतरला. पण दुसऱ्या दिवस अखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात १४ षटकात २ बाद २२ धावा केल्या. त्यावेळी केन विलियम्सन आणि एजाज पटेल खेळत होते. या दोघांनीच तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडकडून खेळण्यास सुरुवात केली.

त्यांनी मोठे शॉट्स न खेळता सयंमी खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र विलियम्सन ७ धावांवर आणि एजाज पटेल ८ धावांवर बाद झाले. त्यानंतर प्रभात जयसूर्याच्या गोलंदाजीपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांचा फार वेळ टिकाव लागला नाही.

रचिन रविंद्रही १० धावा करून निशान पेरिसच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर जयसूर्याने डॅरिल मिचेल (१३), टॉम बंडेल (१), ग्लेन फिलिप्स (०) आणि कर्णधार टीम साऊथी (२) यांना बाद करत ६ विकेट्स पूर्ण केल्या. मिचेल सँटेनरला २९ धावांवर पेरिसने बाद केले.

त्यामुळे न्यूझीलंडचा डाव अवघ्या ८८ धावांवर संपला. त्यामुळे श्रीलंकेला पहिल्या डावात तब्बल ५१४ धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांनी न्यूझीलंडला फॉलोऑन दिला.

फॉलोऑननंतर न्यूझीलंडचा संघ पुन्हा दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला. दुसऱ्या डावातही सलामीवीर टॉम लॅथम शुन्यावरच माघारी परतला.

मात्र, पहिल्या डावातील चुक सुधारत न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवे आणि केन विलियम्सन यांनी दमदार खेळ करत ९६ धावांची भागीदारी केली. मात्र, कॉनवे ६१ धावांवर बाद झाला, तर पाठोपाठ केन विलियम्सनही ४६ धावांवर माघारी परतला.

यानंतर डॅरिल मिचेल आणि रचिन रविंद्र हे देखील फार काळ टिकले नाहीत. मिचेलला एक धावेवर जयसूर्याने बाद केले, तर रचिनला १२ धावांवर पेरिसने त्रिफळाचीत केले. पण त्यानंतर टॉम बंडेल आणि ग्लेन फिलिप्सने डाव सावरला असून अर्धशतकी भागीदारीही केली आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा न्यूझीलंडने ४१ षटकात ५ बाद १९९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टॉम बंडेल ४७ धावांवर, तर ग्लेन फिलिप्स ३२ धावांवर नाबाद खेळत आहेत.

एकूणच पाहिलं, तर न्यूझीलंडचे केन विलियम्सन, डॅरिल मिचेल आणि रचिन रविंद्र हे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दोनवेळा बाद झाले. त्यांनी पहिल्या डावातही याच दिवशी विकेट्स गमावल्या आणि त्यानंतर दुसऱ्या डावातही त्यांनी विकेट्स गमावल्या. आता न्यूझीलंड संघ श्रीलंकेचा चौथ्या दिवशी कसा सामना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT