Sourav Ganguly | Gautam Gambhir Sakal
Cricket

Sourav Ganguly: "त्याला वाटत असेल, तर..." गंभीरच्या कोच बनण्याच्या 'त्या' वक्तव्यावर गांगुलीची मोठी प्रतिक्रिया

Sourav Ganguly on Gautam Gambhir: गौतम गंभीरने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत नुकतेच वक्तव्य केले होते. त्यावर आता सौरव गांगुलीने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Sourav Ganguly on Gautam Gambhir: भारतीय पुरुष क्रिकेट संघाला लवकरच नवा प्रशिक्षक मिळणार आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच मुख्य प्रशिक्षकपदासाठी उमेदवारी अर्ज मागवले होते. अशातच सध्या या महत्त्वाच्या पदासाठी गौतम गंभीरच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या रिपोर्टनुसार भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी गंभीरचे नावही जवळपास निश्चित झाल्याचे समोर आले आहे. अशातच गंभीरने रविवारी (२ जून) म्हटले होते की त्याला भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल, हा मोठा सन्मान असल्याचेही त्याने सांगितले होते.

आता गंभीरच्या या प्रतिक्रियेवर भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने भाष्य केले आहे. त्याने एएनआयशी बोलताना म्हटले आहे की 'जर त्याला प्रशिक्षण द्यायचे आहे, तर मला वाटते तो एक चांगला उमेदवार आहे.'

दरम्यान, आता प्रशिक्षकाच्या नियुक्तीबाबत बीसीसीआय कधीपर्यंत अंतिम निर्णय घेणार आहे, याबाबद स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. मात्र जून 2024 मध्ये सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच नव्या प्रशिक्षकपदाबाबत मोठी घोषणा होऊ शकते.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की प्रशिक्षकपदाबाबतच्या अनेक चर्चा रंगत असतानाच काही दिवसांपूर्वीच 30 मे रोजी गांगुलीने एक सुचक ट्वीट केले होते.

त्याने त्यात लिहिले होते की 'एखाद्या प्रशिक्षकाचं खेळाडूच्या आयुष्यात खूप महत्व असतं. त्याचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव करून घेण्याने एखाद्याचे मैदानावरील अन् मैदानाबाहेरील आयुष्य आणि भविष्य घडतं. त्यामुळं प्रशिक्षक आणि संस्थेची योग्य निवड करणं खूप गरजेचं असतं.' गांगुलीची ही पोस्टही बरीच व्हायरल झाली होती.

भारत-पाकिस्तान सामन्यावरही प्रतिक्रिया

सध्या टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे, तर पाकिस्तानविरुद्धचा बहुचर्चित सामना 9 जून रोजी होणार आहे.

या सामन्याबद्दल गांगुली म्हणाला, 'पाकिस्तानविरुद्ध भारताचा रेकॉर्ड चांगला आहे. भारतीय संघ चांगला खेळत आहे, ते वर्ल्ड कपमध्येची चांगला खेळ करतील. पण टी20 क्रिकेटमध्ये कोणीही जिंकू शकतो.'

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 9 जून रोजी न्युयॉर्कला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.00 वाजता सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT