Virat Kohli | Sourav Ganguly Sakal
Cricket

Sourav Ganguly: 'विराट महान खेळाडू, पण...', गांगुलीचा टी20 वर्ल्ड कपसाठी कोहलीला मोलाचा सल्ला

Virat Kohli: सौरव गांगुलीने टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने विराट कोहली आणि भारतीय संघाबद्दल भाष्य केले आहे.

Pranali Kodre

Sourav Ganguly - Virat Kohli: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला रविवारपासून (2 जून) सुरुवात होत आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच विराट कोहलीच्या भारतीय संघातील फलंदाजी क्रमकाबाबत चर्चा होत आहेत. यात आता भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने आपले मत मांडले आहे.

गांगुलीच्या मते आयपीएल 2024 मध्ये विराट ज्या स्वातंत्र्याने खेळला, तसेच तो टी20 वर्ल्ड कपमध्येही खेळणे महत्त्वाचे राहणार आहे. तसेच तो म्हणाला, विराटने कर्णधार रोहित शर्मासह सलामीला फलंदाजी करायला हवी.

रेवस्पोर्ट्सशी बोलताना गांगुली म्हणाला, 'विराट आणि रोहितने सलामीला फलंदाजी करावी. माझी इच्छा आहे की विराटने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी जशी फलंदाजी केली तशी त्याने टी20 वर्ल्ड कपमध्येही करावी. त्याने स्वातंत्र्य घेऊन फलंदाजी करावी.'

'विराट महान खेळाडू आहे, हे सांगण्याची गरज नाही, पण त्याने भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी आयपीएलमध्ये केली तशी स्वातंत्र्य घेत फलंदाजी करावी. त्यामुळे सलामीसाठी माझी पसंती विराट आणि रोहित यांनाच असेल.'

विराटने आयपीएल 2024 स्पर्धेत 15 सामन्यांत 61.75 च्या सरासरीने आणि 155 च्या स्ट्राईक रेटने 741 धावा केल्या होत्या. यात त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके केली. तो आयपीएल 2024 मधील सर्वाधिक धावा करणाराही क्रिकेटपटू आहे.

गांगुलीकडून भारतीय संघाचे कौतुक

गांगुलीने टी20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या भारतीय संघाचेही कौतुक केले, तसेच संघासाठी कोणती गोष्ट फायदेशीर ठरू शकते, हे देखील सांगितले.

तो म्हणाला, 'संघात अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहेत. तसेच आयपीएलच्या माध्यमातून टी२० क्रिकेट खेळून ते स्पर्धेत उतरत आहेत. याचा न्युयॉर्कमध्ये संघाला फायदा होईल. आणखी एका गोष्टीचा त्यांना फायदा होऊ शकतो, ते म्हणजे मोठ्या मैदानाचा. त्यामुळे आपल्या फिरकीपटूंना त्याचा फायदा होईल.'

'वर्ल्ड कपमध्ये भारताला तुम्ही कमी लेखू शकत नाहीत, याचं साधं कारण म्हणजे संघात खूप प्रतिभा असलेले खेळाडू आहेत.'

भारताला टी20 वर्ल्डकपमधील पहिल्या फेरीतील सामने अमेरिकेत खेळायचे आहेत. पहिल्या फेरीसाठी भारताच्या गटात पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड हे संघ आहेत.

भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. त्यानंतर 9 जूनला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. तसेच 12 जून रोजी अमेरिकेविरुद्ध, तर 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध सामने होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuvir Khedkar: 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर रघुवीर खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; ''मागच्या ५३ वर्षांमध्ये केलेला संघर्ष...''

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर; पैसे कधी हातात पडणार?

Nat Sciver Brunt: तीन हंगामांची प्रतीक्षा संपली! WPL मध्ये पहिलं शतक ठोकलं; नॅट सायव्हर ब्रंटनं रचला इतिहास

Bigg Boss 6: बिग बॉसच्या घरात 'मिस्टर इंडिया'ची झाली वाईल्ड कार्ड एन्ट्री! आता कोण जाणार घराबाहेर?

T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी वेस्ट इंडिजचा १५ सदस्यीय संघ जाहीर! अष्टपैलू खेळाडूंवर भर, पाहा संपूर्ण टीम

SCROLL FOR NEXT