Sourav Ganguly Rohit Sharma Team India Captain sakal
Cricket

Sourav Ganguly : 'आता मला कोणीही शिव्या देत नाही, मीच रोहितला...' सौरव गांगुलीचे धक्कादायक वक्तव्य

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.

Kiran Mahanavar

Sourav Ganguly : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. खरंतर, दादांनी अचानक विराट कोहलीकडून कर्णधारपद काढून रोहित शर्माकडे कमान सोपवण्याच्या निर्णयाची आठवण करून दिली आहे. गांगुलीने त्याच्याच शैलीत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर रोहित शर्माला भारतीय टी-20 टीमचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. त्यानंतर रोहितकडे वनडे आणि कसोटी संघाचीही कमान सोपवण्यात आली. विराटच्या जागी रोहित शर्माला कर्णधार बनवल्याने चाहते प्रचंड संतापले होते.

त्यावेळी सौरव गांगुलीवरही बरीच टीका झाली होती. या दरम्यान एका बंगाली वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दादांनी सांगितले की, 'मी जेव्हा रोहितकडे कर्णधारपद सोपवले तेव्हा माझ्यावर टीका झाली. आणि आता त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही ट्रॉफी जिंकली आहे, मला कोणीही शिव्या देत नाही. मीच त्याला कर्णधार बनवले होते हे सर्वजण विसरले आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2023च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी केली होती. भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत सर्व सामने जिंकले. मात्र टीम इंडियाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

2024 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव केला. या स्पर्धेतही टीम इंडियाने आपले सर्व सामने जिंकले आहेत. भारताचा एक सामना पावसामुळे गमवावा लागला. मात्र, अंतिम फेरीत भारत पुन्हा एकदा विजेतेपदापासून वंचित राहणार असे वाटत होते, मात्र रोहित शर्माने शेवटच्या पाच षटकांत अनेक शानदार निर्णय घेत आपल्या हुशार कर्णधारपदाच्या जोरावर भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT