SL vs WI esakal
Cricket

SL vs WI: वेस्ट इंडिजविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर; माजी कर्णधाराला संघातून वगळले

Sri Lanka cricket Team: श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी कर्णधार सनथ जयसूर्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sri Lanka vs West Indies T20: आगामी वेस्ट इंडिजविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी श्रीलंकेने संघ जाहीर केला आहे. चरिथ असलंका संघाचे नेतृत्व करणार आहे. पण, १७ खेळाडूंच्या या संघात माजी कर्णधार दसून शनकाला भारताविरूद्धच्या मालिकेनंतर या मालिकेतूनदेखील वगळण्यात आले आहे. तर निवृत्तीनंतर संघामध्ये परतलेल्या भानुका राजपक्षेला संघात स्थान देण्यात आले आहे.

जुलैमध्ये झालेल्या ट्वेंटी-२० मालिकेमध्ये सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेला ३-० ने पराभूत केले होते. त्यानंतर वन-डे मालिकेत श्रीलंकेने भारताला २-० ने पराभूत केले होते. भारताविरूद्धच्या मालिकेनंतर श्रीलंका संघ पुढील आठवड्यात तीन ट्वेंटी-२० व तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे.

श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी कर्णधार सनथ जयसूर्याची नियुक्ती करण्यात आली आहे असून वेस्ट इंडिजविरुद्धची ही ट्वेंटी-२० मालिका मुख्य प्रशिक्षक म्हणून जयसूर्याची पहिली मालिका असेल.

१३ ते १७ ऑक्टोबर दरम्यान ही तीन सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी मागील आठवड्यात वेस्ट इंडिजने संघाची घोषणा केली असून वेस्ट इंडिजचे अनुभवी खेळाडू आंद्रे रसेल, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर आणि अकेल होसेन यांनी अचानक मालिकेमधून माघार घेतली आहे. वैयक्तिक कारणांमुळे ही मालिका खेळू शकत नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० व वन-डे संघातून त्यांची निवड रद्द केली आहे.

श्रीलंकेचा ट्वेंटी-२० संघ

चारिथ असलंका (क), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामिंडू मेंडिस, दिनेश चंडीमल, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, वानिंदु हसरंगा,  महेश तीक्षणा, दुनिथ वेल्लालागे, जेफ्री वँडरसे, चामिंडू विक्रमसिंघे, नुवान तुषारा, मथीशा पाथिराना, बिनुरा फर्नांडो, असिथा फर्नांडो.

वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-२० संघ

रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेस (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, ॲलिक अथानाजे, आंद्रे फ्लेचर, टेरेन्स हिंड्स, शे होप, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, गुडाकेश मोती, शेरफेन रदरफोर्ड, रोमारिओ शेफर्ड, शामर स्प्रिंगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT