Stuart Broad Sakal
Cricket

ENG vs WI, Test: दुसऱ्या कसोटीपूर्वी 'या' स्टेडियमच्या एंडला मिळणार स्टुअर्ट ब्रॉडचे नाव, वडीलही झाले भावुक

Stuart Broad: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दुसरा कसोटी सामना गुरुवारी सुरु होणार असून त्यापूर्वी स्टुअर्ट ब्रॉडचा मोठा सन्मान केला जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Stuart Broad honoured with a pavilion of his name at Trent Bridge: वेस्ट इंडिजचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला गुरुवारी (१८ जुलै) सुरुवात होणार आहे.

हा सामना नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी नॉटिंगहॅममध्ये जन्मलेला इंग्लंडचा माजी क्रिकेटपटु स्टुअर्ट ब्रॉड याचा मोठा सन्मान होणार आहे.

ट्रेंट ब्रिज येथील पॅव्हेलियन एंडला त्याचं नाव देऊन त्याला सन्मानित करण्यात येणार आहे.

खरंतर हा निर्णय त्याच्या निवृत्तीनंतर लगेच घेण्यात आला होता, पण त्याच्या पॅव्हेलियन एंडला देण्यात येणाऱ्या त्याच्या नावाचे उद्घाटन सामन्याच्या पहिल्या दिवसाआधी आयोजित करण्यात आला आहे. यासाठी त्याचे वडील ख्रिस ब्रॉडही उपस्थित असतील, त्यांनीही इंग्लंडसाठी 59 सामने खेळले आहेत.

स्टुअर्ट ब्रॉडनी आपल्या कारकिर्दीमध्ये इंग्लंडचे 167 कसोटीत प्रतिनिधित्व केले आणि ६०४ विकेट्स आपल्या नावावर केल्या. 2023 मध्ये ऑस्टेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली. त्याने या सिरीजमध्ये कमालीचे प्रदर्शन दाखवले. तो यानंतरही असेच चांगले प्रदर्शन दाखवतील अशी अपेक्षा होती पण त्यांनी अचानकच निवृत्ती घोषित केली.

ट्रेंट ब्रिज क्रिकेटकडून अधिकृतपणे सांगितले गेले आहे की, 'ट्रेंट ब्रिज कसोटीच्या पहिल्या दिवशी तिकीटधारक प्रेक्षकांनी सकाळी 10: 40 वाजेपर्यंत आपआपल्या जागा घ्याव्या कारण आम्ही अधिकृतपणे स्टुअर्ट ब्रॉडचे नाव पॅव्हेलियन एंडला देणार आहोत.'

दरम्यान, पव्हेलियन एंडला स्टुअर्टचे नाव देण्याचा निर्णयाने त्याचे वडील ख्रिस हे खूश झाले आहेत. त्यांनी आपल्या मुलासह धावाफलकाबरोबरचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ख्रिस म्हणाले, "नॉटिंगहॅमशायर समितीने स्टुअर्टला अशा प्रकारे स्मरणात ठेवण्याचा निर्णय घेतल्याने मला आनंद झाला. एंडकडून स्टुअर्ट ब्रॉड गोलंदाजी करत असल्याची घोषणा ऐकण्यासाठी मी या वर्षी पहिल्यांदा ट्रेंट ब्रिजला भेट दिली, ते खूपच अफलातून होते."

ते पुढे म्हणाले,"मी स्कोअरबोर्डचा एक फोटो घेतला आणि तो स्टुअर्टला पाठवला आणि तिथे त्याचे नाव पाहून तो थोडा भावूक झाला. त्याला हा सन्मान मिळाल्याचे पाहून मला खूप अभिमान आणि विशेषाधिकार वाटतो."

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. पहिल्या सामन्यानंतर निवृत्ती घेतलेल्या जेम्स अँडरसनऐवजी मार्क वूडला संधी देण्यात आली आहे.

स्टुअर्ट ब्रॉडची कारकिर्द

ब्रॉडने 167 कसोटी सामन्यात एकूण 604 विकेट्स घेतल्या असून, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जास्त बळी घेण्याच्या यादीमध्ये तो पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 121 वनडे सामने खेळले असून 178 विकेटस घेतल्या. त्याने 56 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 65 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT