Suryakumar Yadav equals Virat Kohli's world record in 56 fewer matches  sakal
Cricket

Suryakumar Yadav : विराट कोहलीच्या वर्ल्ड रेकॉर्डवर 'सूर्य' ग्रहण! SKY चा श्रीलंकेविरुद्ध मोठा पराक्रम

Suryakumar Yadav equals Virat Kohli's world record : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना शनिवारी (27 जुलै) खेळला गेला.

Kiran Mahanavar

India vs Sri lanka T20 Series 2024 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना शनिवारी (27 जुलै) खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 43 धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवकडून दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. या स्फोटक फलंदाजीने सूर्याने इतिहास रचला आणि दिग्गज विराट कोहलीच्या एका वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली होती. या शानदार खेळीसाठी सूर्याला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब देण्यात आला.

आंतरराष्ट्रीय T20 मधील त्याने 16 व्यांदा 'प्लेअर ऑफ द मॅच' किताब पटकावला आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 16 'प्लेअर ऑफ द मॅच'चे विजेतेपदही जिंकले. 16-16 जेतेपदांच्या बाबतीत सूर्याने किंग कोहलीची बरोबरी केली आहे. त्यामुळे

विराट कोहलीने 125 सामन्यांमध्ये 16 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकले आहेत, तर सूर्याने केवळ 69 सामन्यांमध्ये 16 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकले आहेत. आता सूर्यकुमार यादवने एकदा तरी 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार जिंकला तर तो कोहलीला मागे टाकले.

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक 'प्लेअर ऑफ द मॅच' असलेले खेळाडू

16- सूर्यकुमार यादव (69 सामने)

16 - विराट कोहली (125 सामने)

15 - सिकंदर रझा (91 सामने)

14- मोहम्मद नबी (129 सामने)

14 - रोहित शर्मा (159 सामने)

14 - वीरनदीप सिंग (78 सामने).

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 213/7 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवने संघाकडून सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनीही उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ सुरुवातीला चांगली केली, पण अखेरीस केवळ 170 धावांवरच संघ ऑलआऊट झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT