Suryakumar Yadav  Sakal
Cricket

Suryakumar Yadav: 'मला मिळालेली नवी भूमिका...', भारताचा T20I कर्णधार झाल्यानंतर सूर्याची स्पेशल पोस्ट

Suryakumar Yadav: आगामी भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी संघ निवड झाली असून टी२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. याबाबत आता त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Pranali Kodre

Suryakumar Yadav on India's T20I Captaincy: जुलै महिन्याच्या अखेरीस भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला तीन टी२० आणि तीन वनडे मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील गुरुवारी (१८ जुलै) बीसीसीआयच्या निवड समितीने केली.

या निवडीवेळी काही आश्चर्यकारक निर्णय घेतल्याचेही दिसून आले. भारताच्या टी२० संघाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादवला नियुक्त करण्यात आले. यानंतर सूर्यकुमारने आता शुक्रवारी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

सूर्यकुमारने लिहिले, 'तुम्ही दिलेल्या प्रेम, पाठिंबा आणि शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार. मागील काही आठवडे स्वप्नवत होते आणि मी खरंच कृतज्ञ आहे. देशासाठी खेळणे ही भावना खूप खास आहे, ज्याचे वर्णन शब्दात वर्णन करता येणार नाही.'

'मला मिळालेली नवी भूमिका आपल्यासोबत मोठी जबाबदारी आणि उत्साह घेऊन आली आहे. मला यापुढेही तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळतील अशी आशा आहे. ईश्वर महान आहे.'

सूर्यकुमार यादवला २०२६ टी२० वर्ल्ड कपपर्यंत टी२० संघाचे नेतृत्वपद देण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

खरंतर गेल्याच महिन्यात भारताने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर भारताच्या टी२० संघाचा कर्णधार कोण होणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती.

टी२० वर्ल्ड कपमध्ये हार्दिक भारतीय संघाचा उप-कर्णधार होता. त्यामुळे त्याला ही जबाबदारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, आता निवड समितीने ही जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर सोपवली आहे. तसेच शुभमन गिल याला वनडे आणि टी२० संघांचा उप-कर्णधार करण्यात आले आहे.

सूर्यकुमार टी२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच सूर्यकुमारने यापूर्वी प्रभारी कर्णधार म्हणून भारतीय संघाचे ७ टी२० सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून त्यातील ५ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर २ सामन्यांत पराभव पत्करला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT