Suryakumar Yadav Gautam Gambhir sakal
Cricket

IND vs SL : जो बोलते है ना...! Suryakumar Yadav कोच गौतम गंभीरसोबतच्या नात्यावर व्यक्त झाला Video

India vs Sri Lanka Surya kumar yadav - रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडिया ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली नवीन पर्वाला सुरुवात करत आहे. उद्यापासून भारत-श्रीलंका ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत आहे.

Swadesh Ghanekar

India tour Sri Lanka Captain Suryakumar Yadav - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघ पहिलीच ट्वेंटी-२० मालिका खेळण्यासाठी उद्या मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा या दिग्गजांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० पर्व संपल्यानंतर टीम इंडिया नव्या सुरुवातीला सज्ज झालील आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आणि गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचे नवे पर्व सुरू होत आहे.

राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडल्यानंतर गौतम गंभीरची या भूमिकेसाठी निवड झाली. राहुल द्रविडने मिळवलेले यश कायम राखण्याचे आव्हान गौतमच्या खांद्यावर आहे. त्याने त्याच्या पहिल्याच दौऱ्यासाठी संघात बदल केलेला दिसला आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे त्याने सूर्यकुमारची ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून केलेली निवड... हार्दिक पांड्या या पदासाठी प्रमुख दावेदार होता, परंतु गौतम व निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी सूर्याची निवड केली. या निर्णयाने सर्वांना आश्चर्य वाटले, परंतु गौतमने भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतला. हार्दिकची दुखापत हेही त्यामागचं प्रमुख कारण आहे.

कर्णधार झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने प्रथमच त्याच्या भावना व्यक्त केल्या. आक्रमक फटकेबाजी आणि इनोव्हेटीव्ह फटक्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सूर्याने यावेळी कोच गौतम गंभीरसोबतच्या नात्यावर भाष्य केले.

''आमच्यातलं नातं खूप खास आहे. कारण मी २०१४ मध्ये मी त्याच्या नेतृत्वाखाली KKR कडून खेळलो होतो. हे नातं खास आहे कारण, तिथून मला फ्रँचायझीकडून खेळण्याची संधी मिळाली. म्हणतात ना, तुम्ही तीन पाऊलं चाला, आपणही दोन पाऊलं चालूया आणि मध्येच कुठेतरी आपली भेट होईल... असे आमचे नातं होतं आणि आजही ते ते तसेच आहे, घट्ट...'',असं सूर्या BCCI ने पोस्ट केलेल्या व्हिडीओत व्यक्त झाला.

कोलकाता नाईट रायर्डसकडून खेळल्याच्या जुन्या आठवणींना सूर्याने उजाळा दिला. यावेळी त्याने परस्पर समंजसपणा आणि समर्थनावर जोर दिला, ज्यामुळे त्यांचे नाते घट्ट झाले. हेच नातं नव्या भूमिकेतही कायम राहिल असे, सूर्याने म्हटले.

''त्याला माहित्येय मी कसं काम करतो. मी सराव सत्रात येतो तेव्हा माझ्या डोक्यात काय सुरू असते, हेही तो जाणतो. कोच म्हणून तो त्याचा कसा वापर करून येतो यासाठी उत्सुक आहे. शेवटी आमच्यात सुंदर नातं आहे आणि ते पुढे कसं अधिक चागलं होतं, याची उत्सुकता आहे,''असेही सूर्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातल्या गूढ अपघाताचा उलगडा… कोकणातून हॉटेल चालकाचा फोन ठरला टर्निंग पाईंट! नाहीतर...

Kolkata Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोलकाता हादरले; लोक घाबरून घरं सोडून पळाले; बांगलादेशातही बसले हादरे

Television Day 2025: स्क्रीनवरचे डाग होतील गायब! ‘या’ 3 उपायांनी करा टीव्हीची परफेक्ट स्वच्छता

Latest Marathi News Live Update : विद्येचे धडे देणाऱ्या मुख्याध्यापकांचा शाळेत मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT