Yuvraj Singh on Dinesh Karthik in T20 World Cup Sakal
Cricket

T20 World Cup: '...तर दिनेश कार्तिकला टीम इंडियात संधी देण्यात अर्थ नाही,' वर्ल्ड कप अँबेसिडर युवराज असं का म्हणाला?

Yuvraj Singh on Dinesh Karthik: आयसीसीने युवराज सिंगला आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी अँबेसिडर म्हणून निवडले असून यावेळी त्याने भारतीय संघाबद्दलही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Dinesh Karthik: जून 2024 मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी सहभागी संघांची तयारी झाली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) उसेन बोल्ट आणि ख्रिस गेल यांच्याबरोबरच भारताचा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग याचीही या स्पर्धेचा अँबेसिडर म्हणून घोषणा केली आहे.

युवराज 2007 टी20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा भाग राहिला आहे. तसेच याच स्पर्धेत त्याने एकाच षटकात 6 षटकार मारण्याचा पराक्रमही केला होता, त्याचबरोबर 12 चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रमही त्याने 2007 टी20 वर्ल्ड कपमध्ये केला होता.

दरम्यान, आयसीसीशी बोलताना युवराजने या टी20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात येणाऱ्या भारतीय संघाबद्दलही त्याची मतं मांडली आहेत. यावेळी त्याने दिनेश कार्तिकबद्दलही भाष्य केले.

यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने यंदाच्या आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स शानदार कामगिरी केली आहे. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्येही खेळत आहे. अशात त्याच्या कामगिरीने युवराजलाही प्रभावित केले आहे.

मात्र, युवराजने म्हटले आहे की कार्तिकला आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात संधी तेव्हाच दिली जावी, जर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार असेल, नाहीतर त्याला संधी देण्यात काहीच अर्थ नाही.

युवराज म्हणाला, 'दिनेश कार्तिक सध्या चांगली फलंदाजी करतोय. पण गेल्यावेळी 2022 मध्ये त्याला टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवडले होते, परंतु, त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. जर दिनेश कार्तिक तुमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसेल, तर मला वाटत नाही की त्याला निवडण्यात काही अर्थ आहे.'

युवराज पुढे म्हणाला, 'ऋषभ पंत, संजू सॅमसन असे काही खेळाडू आहे. हे दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि दिनेशपेक्षा तरुणही आहेत. मला दिनेश कार्तिकला संघात पाहायला आवडेलच, पण जर जो खेळणार नसेल, तर जो खेळाडू तरुण आहे आणि सामन्यात मोठा फरक पाडू शकतो, त्याला निवडणे योग्य असेल.'

कोण ठरू शकतं महत्त्वाचा खेळाडू?

युवराजने टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघासाठी हुकमी एक्का कोणते खेळाडू ठरू शकतात, याबाबतही मत व्यक्त केले आहे. त्याने म्हटले की सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह प्रमुख खेळाडू ठरू शकतात.

युवराज म्हणाला, 'सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू ठरू शकतो, कारण तो ज्याप्रकारे खेळतो, त्यानुसार तो 15 चेंडूतच सामन्याचे रंग रुप बदलू शकतो.'

'मला वाटते जसप्रीत बुमराह देखील गोलंदाजी महत्त्वाची भूमिका निभावेल, मला संघात एक लेग स्पिनरही पाहायला आवडेल, जसे की युजवेंद्र चहल सध्या खूप चांगली गोलंदाजी करत आहे.'

शिवम दुबेलाही पसंती, तर विराट-रोहितच्या भविष्यावरही भाष्य

युवराजने टी20 वर्ल्ड कपसाठी शिवम दुबेलाही निवडले जावे, असे मत व्यक्त केले आहे. त्याने म्हटले आहे की तो गेम चेंजर ठरू शकतो.

याशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्माच्या भविष्याबद्दलही भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे की 'जसजसे तुमचे वय वाढते तसे लोक त्याबद्दल बोलायला लागतात आणि तुमचा फॉर्मला विसरतात. हे खेळाडू भारताचे दिग्गज खेळाडू आहेत आणि त्यांना हवे तेव्हा निवृत्त होण्यासाठी ते पात्र आहेत.'

युवराज पुढे म्हणाला, 'मला टी20 प्रकारात युवा खेळाडूंना पाहायला आवडेल, ज्यामुळे अनुभवी खेळाडूंवरील भार कमी होईल, कारण ते वनडे आणि कसोटीही खेळतात. या टी20 वर्ल्ड कपनंतर मला संघात अनेक युवा खेळाडूंना पाहायला आवडेल आणि पुढच्या टी20 वर्ल्ड कपसाठी एक संघ यातून तयार व्हावा.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT