Matthew Wade Sakal
Cricket

T20 World Cup 2024: ऑस्ट्रेलियाच्या विकेट किपरला ICC ने सुनावलं, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केलेली चूक पडली महागात

Matthew Wade: ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक मॅथ्यु वेड याला आयसीसीने फटकारले आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पंचांशी वाद घातले होते.

Pranali Kodre

T20 World Cup 2024, Australia vs England: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा सध्या वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे चालू आहे. या स्पर्धेत शनिवारी (8 जून) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात बार्बाडोस येथे सामना झाला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 36 धावांनी विजय मिळवला होता. मात्र, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड याचे पंचांशी वाद झाले होते. त्याचमुळे आयसीसीने त्याच्यावर कारवाई केली आहे.

आयसीसीने म्हटले आहे की वेडने आचार संहितेचा भंग करण्याची चूक केली आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार वेडने आयसीसीच्या आचार संहितेतील कलम 2.8 चा भंग केला आहे. हा कलम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयाविरुद्ध वाद घालण्याबद्दलचा आहे.

या चूकीसाठी आयसीसीने त्याला फटकारले असून त्याला अधिकृतरित्या याबाबत चेतावणी देण्यात आली आहे. तसेच त्याला एक डिमिरिट पाँइंटही देण्यात आला आहे. ही त्याची 24 महिन्यांच्या काळातील पहिली चूक होती.

झाले असे की या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेड फलंदाजी करत असताना 18 व्या षटकात आदिल राशिदने टाकलेला तिसरा चेंडू मैदानातील पंच नितीन मेनन यांनी डेड बॉल दिला नाही, याचमुळे वेडने त्यांच्याची वाद घातला होता.

त्याच्यावरील मैदानातील पंच नितीन मेनन आणि जोएल विल्सन, थर्ड अंपायर असीफ याकूब आणि फोर्थ अंपायर जयरामन मदनगोपाल यांनी आरोप लावले होते. त्यानंतर सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी त्याच्यावर कारवाई केली. वेडने त्याची चूक मान्य केली असून कारवाईही मान्य केली आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर वेड 17 धावांवर नाबाद राहिला. तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाकडून डेव्हि़ड वॉर्नरने सर्वाधिक 39 धावा केल्या, त्याचबरोबर कर्णधार मिचेल मार्श (35), ट्रेविस हेड (34), मार्कस स्टॉयनिस (30) आणि ग्लेन मॅक्सवेल (28) यांनी छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 7 बाद 201 धावा उभारल्या.

इंग्लंडकडून गोलंदाजीत ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या, तसेच मोईन अली, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जॉस बटलर (42) आणि फिलिप सॉल्ट (37) यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर इंग्लंडकडून कोणत्याही फलंदाजाला खास काही करता आले नाही. त्यामुळे इंग्लंडला 20 षटकात 6 बाद 165 धावाच करता आल्या.

ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झाम्पा आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच जोश हेजलवूड आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भाषणावर सत्ताधाऱ्यांनी का घातला गोंधळ? विरोधी पक्षनेत्याला बोलूच दिलं नाही; कामकाज तहकूब करण्याची वेळ

Crime News : घराच्या अंगणातच गाडले आई-वडिल अन् बहिणीचे प्रेत अन्... भयानक हत्याकांडापुढे 'दृश्यम' ची कहाणी देखील फेल !

मिचेल मार्शने केली पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद; India vs Pakistan लढतीवरील बहिष्कारावर विचारलेला प्रश्न अन्... Video

Latest Marathi News Live Update: अजित दादांच्या विमानाचा घातपात, आंतरराष्ट्रीय यंत्रणांकडून तपास करा, सुषमा अंधारे यांची मागणी

Acidity Foods: सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? आजच आहारातील 'या' 3 पदार्थांना म्हणा टाटा-बाय-बाय!

SCROLL FOR NEXT