IND vs PAK T20 World Cup 24  esakal
Cricket

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

अनिरुद्ध संकपाळ

IND vs PAK T20 World Cup 24 : टी 20 वर्ल्डकप 2024 मधील भारत - पाकिस्तान सामना हा अवघ्या काही आठवड्यांवर आला आहे. दोन वर्षापूर्वी टी 20 वर्ल्डकपमध्ये भारत - पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी हे मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भिडले होते. त्यावेळी स्टेडियममध्ये जवळपास 90 हजार प्रेक्षक होते. आता न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या भारत - पाकिस्तान सामन्यावेळी काय होईल याचा कोणालाच अंदाज नाही.

गेल्या वर्षी वनडे वर्ल्डकपमध्ये हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी अहमदाबादमध्ये भिडले होते. त्यावेळी या शहरातील हॉटेल रूम्सचे भाडे देखील गगणाला भिडले होते. शहरातील सर्व हॉटेल्सच्या रूम्स बूक झाल्या होत्या. यंदाही न्यूयॉर्कमध्ये असंच काहीसं होण्याची शक्यता आहे.

न्यूयॉर्कमध्ये भारत - पाकिस्तान सामन्याचीच चर्चा

लोकं भारत - पाकिस्तान सामन्याची तिकीटे बूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना प्रचंड मोठी भाडेवाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. न्यूयॉर्कमधील हॉटेल्स रूम्सचे भाडे जवळपास 600 टक्क्यांनी वाढले आहे. ज्या रूम्स 2 मे ला एका रात्रीसाठी 113 डॉलर्समध्ये (9,422 रूपये) उपलब्ध होत होत्या त्यांचे दर 9 जून दरम्यान 799 डॉलर म्हणजे जवळपास 66,624 रूपयांपर्यंत पोहचले आहेत. काही हॉटेल्सनी आपल्या रूम्सचे भाडे 600 टक्के नाही मात्र दुप्पट नक्कीच केलं आहे.

न्यूयॉर्क शहरालगतच्या हॉटेल रूम्सचं भाडं

रेड रूफ प्लस लाँग आईसलँड - गार्डन सिटी - 2 मे रूम भाडं 9,422 रूपये - 9 जूनचं रूम भाडं 66,624 रूपये

ला क्वेंटा बाय वेनधम - गार्ड सिटी - 2 मे रूम भाडं 16923 रूपये - 9 जूनचं रूम भाडं 67,276 रूपये

लाँग आइसलँड मॅरिओट - 2 मे रूम भाडं 19,273 रूपये - 9 जूनचं रूम भाडं 40,300 रूपये

कोर्टयार्ड बाय मॅरिओट वेस्टब्युरी लाँग आईसलँड - 2 मे रूम भाडं 14,925 रूपये - 9 जूनचं रूम भाडं 58,322 रूपये

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

Latest Marathi News Updates: राऊतांचं स्कील भल्या भल्यांना आत्मसात करता येणार नाही - आव्हाड

Tata Power: टाटाकडून मोठं गिफ्ट! तीन महिन्यात ४५ हजार घरात सौर प्रकाश

IND vs ENG 3rd Test : मोहम्मद सिराजच्या 'या' कृतिचा अर्थ काय? जाणाल तर भावनिक व्हाल, Video Viral

महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार! असोसिएशनकडून राज्यव्यापी बंदची घोषणा, कधी आणि का?

SCROLL FOR NEXT