T20 World Cup 2024 Team India Practice Match  esakal
Cricket

T20 World Cup 2024 : न्यूयॉर्क की फ्लोरिडा... भारताच्या सराव सामन्याबाबत गोंधळ

New York or Florida... Confusion over India's practice match; टी २० विश्वचषक २०२४

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2024 Team India Practice Match : आयपीएलचा हंगाम 26 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर 1 जूनपासून युएसए आणि वेस्ट इंडीज येथे टी 20 वर्ल्डकप सुरू होणार आहे. दरम्यान, टीम इंडिया वर्ल्डकपपूर्वी किती अन् कुठं सामना खेळायचा याच्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे.

क्रीकबझने दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ फक्त एक सराव सामना खेळणार आहे. भारतीय संघातील सर्व खेळाडू हे गेले दोन महिने आयपीएल खेळत आहेत. त्यामुळे त्यांना फक्त एक सराव सामना मिळणार आहे. टीम इंडिया हा सराव सामना न्यू यॉर्कमध्ये खेळण्यासाठी आग्रही आहे. त्यांना फ्लोरिडाला सामना खेळायचा नाहीये.

आता इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ एक जूनला बांगलादेशविरूद्ध न्यू यॉर्कमध्ये सामना खेळणार आहे. याच व्हेन्यूवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जूनला सामना होणार आहे.

भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटे अजून उपलब्ध

आयसीसी इव्हेंटचे हेड ख्रिस टेट्ले यांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्तान सामन्याची तिकीटे अजून उपलब्ध आहेत. लोकांना टी 20 वर्ल्डकपमधील हाय व्होल्टेज सामन्यांसाठी तिकीटे मिळवण्याची मर्यादित संधी अजून उपलब्ध आहे. प्रत्येक सामन्यासाठी अजून काही तिकीटे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भारतीय संघ कधी होणार रवाना?

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय संघातील काही खेळाडू हे 21 मे रोजी युएसएसाठी रवाना होणार होते. मात्र आता दोन बॅचमध्ये खेळाडू रवाना होणार असून प्ले ऑफमध्ये न खेळणारे खेळाडू हे 25 मे रोजी रवाना होतील. त्यानंतर पुढच्या खेळाडूंचा समुह हा आयपीएलची फायनल झाल्यावर रवाना होणार आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Crime : पद्मश्री नामांकित डॉक्टरांचा तपास; अवैध किडनी व्यवहारातील मोठे खुलासे; चंद्रपूर पोलिसांची विशेष कारवाई सुरु!

Gold Rate: २०२६ मध्ये सोन्याचा दर २ लाखांपर्यंत पोहोचणार? ज्योतिषांचं भविष्याबद्दल भाकित, दर वाढीचे स्पष्ट संकेत

Savalyachi Janu Savali मध्ये मोठा ट्विस्ट; असं समोर येणार सावलीच्या आवाजाचं सत्य; नेटकरी खुश, म्हणतात-

Elon Musk’s big hint for Content Creators : इलॉन मस्क करणार ‘कंटेट क्रिएटर्स’ना मालामाल!, ‘Youtube’ पेक्षा जास्त पैसा 'X' देणार

Dombivli Politics: ज्यांच्याशी वाद, त्यांच्याच सोबत रणनीती! डोंबिवलीत पॅनल २२ मधील ‘राजकीय गणित’ उघड

SCROLL FOR NEXT