Cricket

MS धोनी टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला जाणार? रोहित शर्माने केलं मोठं वक्तव्य

आयपीएल 2024 मध्ये माजी CSK कर्णधार एमएस धोनी आणि RCB विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक अप्रतिम फलंदाजी करत आहेत. आता रोहितने धोनी आणि कार्तिक अमेरिकेतमध्ये येण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

Kiran Mahanavar

सध्या आयपीएल 2024 मध्ये टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मापासून टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीपर्यंत सर्वच जण अप्रतिम कामगिरी करत आहेत. हे दोन्ही खेळाडू आपल्या स्फोटक फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत.

आयपीएलनंतर टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप खेळायचा आहे. त्याबाबत लवकरच टीम इंडियाची घोषणाही केली जाऊ शकते. याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने एमएस धोनी आणि दिनेश कार्तिकबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

धोनी वर्ल्ड कपसाठी अमेरिकेत येणार आहे का?

क्लब प्रेयरी फायर पॉडकास्टमध्ये ॲडम गिलख्रिस्ट आणि मायकेल वॉन यांच्याशी संवाद साधताना रोहित शर्मा म्हणाला की, एमएस धोनी आणि दिनेश कार्तिक या हंगामात ज्या प्रकारे फलंदाजी करत आहेत. त्यामुळे मी खूप प्रभावित झालो आहे. धोनीने शेवटच्या सामन्यात फक्त 4 चेंडू खेळले आणि 22 धावा केल्या, त्याने जबरदस्त प्रभाव पाडला.

मात्र, धोनीला दुखापत झाल्यामुळे वेस्ट इंडिजमध्ये येण्यासाठी त्याला पटवणे कठीण आहे. तो अमेरिकेत येत असला तरी तो गोल्फ खेळायला येणार आहे. याशिवाय, दिनेश कार्तिकला वेस्ट इंडिजमध्ये येण्यासाठी पटवणे सोपे जाईल, असे मला वाटते.

आरसीबीचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आयपीएल 2024 मध्ये अप्रतिम फलंदाजी करत आहे. आणि फिनिशरची भूमिका उत्तम बजावत आहे. दिनेशने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ज्याप्रकारे शानदार फलंदाजी केली, त्यावरून 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये त्याचा समावेश करण्याची मागणी होत आहे.

दिनेश कार्तिकच्या कामगिरीने प्रभावित झालेल्या रोहितने सांगितले की, दिनेश कार्तिक हा टी-20 वर्ल्ड कपसाठी खूप चांगला पर्याय असू शकतो. रोहित शर्माच्या या वक्तव्यावरून बीसीसीआयचे निवडकर्ते दिनेश कार्तिकच्या नावावर चर्चा करू शकतात असे दिसते. कारण दिनेशचा अलीकडचा फॉर्म खूपच उत्कृष्ट आहे आणि त्याला अनुभवही खूप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT