Tanush Kotian  esakal
Cricket

Ranji Trophy 2024: कोटियनच्या ५ विकेट्स अन् मुंबईचं सामन्यात पुनरागमन! बडोद्याला १८५ धावांवर गुंडाळलं

Mumbai vs Baroda: मुंबई रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना बडोद्याविरूद्ध खेळत असून मुंबईने बडोदा संघाचा दुसरा डाव १८५ धावांवर आटपून सामन्यात पुनारागमन केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai vs Baroda: रणजी ट्रॉफी स्पर्धेमध्ये गतविजेता मुंबई संघ बडोदाविरूद्ध आपला पहिला सामना खेळत आहे. पहिल्या डाव २१४ धावांवर संपुष्टात आल्यामुळे मुंबई संघ सामन्यात पिछाडीवर गेला होता परंतु दुसऱ्या डावात बडोदा संघाला १८५ धावांवर गुंडाळून मुंबईने सामन्यात पुनरागमन केले आहे. अजून एका दिवसाचा खेळ शिल्लक असून मुंबईकडे सामन्यात आघाडी घेऊन सामना जिंकण्याची संधी आहे.

नाणेफेक जिंकून बडोद्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने सामन्याची सुरूवात चांगली केली. ५ बाद ९० अशी बडोदा संघाची परिस्थीती होती. परंतु, मितेश पटेल आणि अतीत शेठच्या जोडीने बडोद्याचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली आणि पहिल्या डावात बडोद्याने २९० धावांचा टप्पा गाठला.

प्रत्युत्तरात उतरलेल्या मुंबई संघामध्ये आयुष म्हात्रे व्यतिरीक्त इतर कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही. आयुषने ७१ चेंडूंमध्ये ५२ धावांची खेळी केली. परंतु इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे मुंबईचा डाव २१४ धावांवर संपुष्टात आला आणि बडोद्याने सामन्यात ७६ धावांनी आघाडी घेतली. या डावामध्ये बडोद्याच्या भार्गव भट्टने ४ व आकाश सिंगने ३ विकेट्स घेतले.

दुसऱ्या दिवशी मुंबईला गुंडाळलेल्या बडोदा संघाकडे मोठा डाव खेळून सामन्यात वर्चस्व निर्माण करण्याची संधी होती. परंतु मुंबईच्या गोलंदाजांनी बडोद्याच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टीकू दिले नाही. ६ बाद ४१ अशी बडोद्याची बिकट परिस्थिती असताना सातव्या क्रमांकावर आलेल्या कृणाल पांड्याने अतीत शेठला साथीला घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी सातव्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. परंतु इराणी कप स्पर्धेमध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा स्टार खेळाडू तनुष कोटियन पुन्हा एकदा मुंबई साठी संकट मोचक बनून आला आणि अतीतला (२६) बाद करून कृणाल-अतीतची भागीदारी तोडली.

पुढे हिमांशू सिंगने कृणाल पांड्याला ५५ धावांवर बाद केले. तर तनुषने महेश पिठीयाला ४० धावांवर बाद केले. मुंबईला गरज असताना तनुष कोटियन ५ विकेट घेत याही वेळा संघासाठी संकट मोचक बनला आणि बडोदा संघाचा डाव १८५ धावांवर आटपला. हिमांशू सिंगने डावात ३ विकेट्स घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT