Deepak Chahar Marathi News 
Cricket

Deepak Chahar : भारतीय स्टार खेळाडूची झाली फसवणूक; Zomato वरून जेवण ऑर्डर केलं पण...

इंडियन प्रीमियर लीगचा सतरावा हंगाम सुरू होण्यासाठी फक्त एक महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला आहे.

Kiran Mahanavar

इंडियन प्रीमियर लीगचा सतरावा हंगाम सुरू होण्यासाठी फक्त एक महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला आहे. अलीकडेच बीसीसीआयने आयपीएल 2024 चे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. आयपीएल 2024 चा थरार 22 मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र याआधी भारतीय संघाचा आणि चॅम्पियन टीम चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाज दीपक चहरसोबत फसवणूक झाली आहे. त्याने ट्विट करून ही माहिती दिली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया....

स्टार गोलंदाज दीपक चहरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट ट्विटर (X) वर लिहिले, "भारतात नवीन फसवणूक. Zomato वर जेवणाची ऑर्डर दिली, पण जेवण मिळाले नाही. जेव्हा मी ग्राहक सेवेला कॉल केला. तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्हाला जेवन दिले आहे. आणि मी खोटे बोलत आहे. मला खात्री आहे की अनेकांना अशाच समस्या येत असतील. तुम्ही झोमॅटोला टॅग करा आणि त्यांना तुमची गोष्ट सांगा."

दीपक चहर यांनी X वर फूड डिलिव्हरी कंपनीला देखील टॅग केले आहे. कंपनीने दीपकला उत्तर दिले आणि लिहिले, "हाय दीपक, आम्ही तुमच्या अनुभवाबद्दल खूप चिंतित आहोत आणि कोणत्याही गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. निश्चिंत राहा, आम्ही अशा समस्या गांभीर्याने घेतो आणि ते लवकरच सोडवू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT