ICC Women’s T20 World Cup 2024 : esakal
Cricket

Semi Final scenarios: Team India उपांत्य फेरीत प्रवेश कसा मिळवणार? ऑस्ट्रेलियाने मदत केलीय खरी, पण त्यांच्याच अडथळा

ICC Women’s T20 World Cup 2024 : भारतीय संघाला अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे.

Swadesh Ghanekar

ICC Women’s T20 World Cup 2024 : आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कोणत्याही संघाने अधिकृतपणे अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केलेले नसले तरी उपांत्य फेरीचं चित्र आता स्पष्ट होत चाललं आहे. ऑस्ट्रेलियाने काल ९ विकेट्स राखून पाकिस्तानवर विजय मिळवताना उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याचवेळी त्यांनी भारतीय संघाची मदत केलेली आहे, परंतु हरमनप्रीत कौर अँड टीमच्या मार्गात कांगारूंचाच अडथळा आहे.

ग्रुप अ

ऑस्ट्रेलिया ( ६ गुण व २.७८६ नेट रनरेट)

एलिसा हिलीचा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जातोय, परंतु काही खेळाडूंच्या फिटनेसच्या समस्येने त्यांना सतावले आहे. सहावेळा वर्ल्ड कप उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियाने अ गटातील ३ सामने जिंकून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. त्यांना बाहेर करायचे असल्यास भारताकडून त्यांचा दारूण पराभव आणि न्यूझीलंडचे दोन मोठे विजय आवश्यक आहे.

भारत ( ४ गुण व ०.५७६ नेट रनरेट)

भारतीय संघाने आशिया चषक विजेत्या श्रीलंकेला पराभूत करून उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर भारताने चांगले पुनरागमन केले. श्रीलंकेला नमवून हरमनप्रीत कौर अँड टीमने नेट रनरेटमध्ये प्रचंड सुधारणा केली आहे. आता त्यांना शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा लागेल. नाहीतर इतरांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल.

न्यूझीलंड ( २ गुण व -०.०५० नेट रनरेट)

न्यूझीलंडने वर्ल्ड कप स्पर्धेत सुरुवात दणक्यात केली,परंतु पुढच्या सामन्यात त्यांची हार झाली. त्यामुळे त्यांना उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. ऑस्ट्रेलियाकडून ६० धावांनी हरल्यामुळे न्यूझीलंडचा नेट रनरेटही पडला आहे.

पाकिस्तान ( २ गुण व -०.४८८ नेट रनरेट)

पाकिस्तानला ३ सामन्यांत १ विजय मिळवता आला आहे आणि त्यांचे आव्हान संपल्यात जमा आहे. भारत शेवटच्या साखळी सामन्यात पराभूत झाला आणि न्यूझीलंडने उर्वरित सामने गमावले तर पाकिस्तानला संधी आहे. त्यासाठी त्यांना साखळी गटातील शवेटची लढत जिंकावी लागेल आणि तेव्हा नेट रनरेट निर्णायक ठरेल.

श्रीलंका ( ० गुण व -२.५६४ नेट रनरेट)

श्रीलंकेचे आव्हान संपलेच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT