Team India Jersey Sakal
Cricket

Team India Jersey: टीम इंडियाची T20 जर्सी जेठालालसारखी! सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस, भन्नाट मीम्स व्हायरल

Team India T20 Jersey: टी20 वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघाची नवी जर्सी लाँच करण्यात आली असून त्याबद्दल सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

Pranali Kodre

Team India T20 Jersey: जून 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये टी20 वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाची नवी टी२० जर्सी लाँच करण्यात आली. दरम्यान, या नव्या जर्सी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाल्या आहेत.

सोमवारी (6 मे) भारतीय संघाचे किट स्पॉन्सर आदीदासने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय संघाची नवीन टी20 जर्सी लाँच केली आहे. भारताची नवीन टी20 जर्सी निळ्या आणि केशरी अशा दोन रंगात आहे.

पुढच्या बाजूने आणि मागून निळ्या रंगात ही जर्सी असून हाताला केशरी रंग आहे. तसेच आदीदासची ओळख असलेले पांढरे पट्टेही खांद्यावर आहेत. त्याचबरोबर गळ्याला केशरी, पांढरा आणि हिरवा असे भारताच्या राष्ट्रध्वजातील तीन रंग आहेत.

दरम्यान, ही जर्सी लाँच झाल्यानंतर अनेक चाहत्यांना प्रसिद्ध दैनंदिन मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' यातील एका एपिसोडची आठवण झाली आहे.

चाहत्यांच्या मते या मालिकेतील एका एपिसोडमध्ये 'गोकुळधाम प्रीमियर लीग'चे आयोजन झालेले असते, ज्यात जेठालाल या भूमीकेने जशी जर्सी घातली होती, त्याच्याशी मिळतीजुळती भारतीय संघाची नवी टी20 जर्सी आहे. त्यामुळे अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत.

दरम्यान, ही नवी जर्सी भारतीय संघ आगामी टी२० वर्ल्ड कपमध्ये घालणार आहे. या जर्सीची किंमत आदिदासने 5,999 रुपये ठेवली आहे.

भारतीय संघ आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार असून हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

तसेच या भारतीय संघात ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना यष्टीरक्षक म्हणून संधी मिळाली आहे. त्याचबरोबर विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह असे अनुभवी खेळाडूही संघात आहेत.

  • टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

  • राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT