India Squad vs Sri Lanka sakal
Cricket

India Squad vs Sri Lanka : गौतम गंभीरकडून MS Dhoniचे शिलेदार दुर्लक्षित! फॉर्म असूनही संघात नाही स्थान

India Squad for Sri Lanka Tour 2024 : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा कार्यकाळ श्रीलंका दौऱ्यापासून सुरू होणार आहे.

Kiran Mahanavar

India Squad for Sri Lanka Tour 2024 : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा कार्यकाळ श्रीलंका दौऱ्यापासून सुरू होणार आहे. 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

सूर्यकुमार यादवला या संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. त्याचवेळी रोहित शर्मा वनडे संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तर या दौऱ्यावरील दोन्ही मालिकेसाठी शुभमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

पण धोनीच्या सेनापतीना टी-20 आणि वनडे संघात स्थान मिळालेले नाही. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा धोनीचा विश्वासू स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा वनडे संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यावेळी सलामीवीर ऋतुराज गायकवाडला पण टी-20 संघात स्थान मिळालेले नाही.

जडेजा नुकताच टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियाचा भाग होता. मात्र, त्याची कामगिरी काही विशेष नव्हती. या स्पर्धेनंतर जडेजाने या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. आता त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी वनडेमध्ये स्थान मिळालेले नाही. जडेजा अनेकवेळा टीम इंडियासाठी मोठा मॅचविनर ठरला आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने शानदार गोलंदाजी केली आणि 11 सामन्यांमध्ये 16 विकेट घेतल्या. वनडे फॉरमॅटमधील जडेजाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्याने 2756 धावा आणि 220 विकेट घेतल्या आहेत.

दुसरीकडे झिम्बाब्वे दौऱ्यात फारशी चमक न दाखवताही रियान परागला टी-20 आणि एकदिवसीय या दोन्ही प्रकारांत स्थान देण्यात आले आहे; मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकविजेत्या संघाचा कर्णधार महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला वगळण्यात आले. त्या दौऱ्यावर ऋतुराज गायकवाड केवळ 3 डावात 66.50 च्या सरासरीने 133 धावा केल्या होत्या.

अभिषेक शर्माही बाहेर

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शतक झळकावणारा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माची श्रीलंका टी-२० मालिकेसाठी निवड झालेली नाही. आपल्या पहिल्याच सामन्यात अभिषेक शून्यावर बाद झाला होता, पण पुढच्याच सामन्यात त्याने दमदार पुनरागमन करत 100 धावांचे शतक झळकावले.

टी-20 साठी संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.


एकदिवसीय मालिकेसाठी : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT